Join us

शिव ठाकरे प्रेमात! मिस्ट्री गर्लबरोबरच्या फोटोनंतर Ex गर्लफ्रेंड वीणाची पोस्ट, म्हणते- "काहीही झालं तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 13:34 IST

शिवचा मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र Ex गर्लफ्रेंड वीणा जगतापनेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

'बिग बॉस मराठी ४'मुळे मराठमोळा शिव ठाकरे चर्चेत आला होता. या पर्वात त्याची वीणा जगतापबरोबर जोडी जमली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही काही काळ शिव आणि वीणा रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी जाहिरपणे त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले. वीणाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडला आहे. शिवने एका मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

शिवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मिस्ट्री गर्लला आपल्या मिठीत घेतल्याचं दिसत आहे. तिच्या कपाळावर तो kiss करताना दिसत आहे. पण, या फोटोमध्ये मुलीच्या चेहऱ्यावर त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.  त्यामुळे शिवबरोबर दिसणारी ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे? हे कळू शकलेलं नाही. 

पण, शिवचा मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र Ex गर्लफ्रेंड वीणा जगतापनेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. वीणाने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते- "मी कितीही एकटी असले तरी टॉक्झिक लोकांना माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही". वीणाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. शिवने मिस्ट्री गर्लबरोबर फोटो शेअर केल्यानंतर वीणाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वीणाच्या या पोस्टमुळे पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. 

शिवने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेत आपली ओळख बनवली. 'रोडीज', 'बिग बॉस मराठी', 'बिग बॉस हिंदी', 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. तर वीणाने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. 

टॅग्स :शीव ठाकरेवीणा जगतापटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी