Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरत- ईशाच्या घटस्फोटाबाबत लेकी आहेत अनभिज्ञ; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:35 IST

Esha deol: घटस्फोटानंतर ईशाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे ती तिच्या लेकींसोबत आता जीवनात पुढे वळल्याचं दिसून येत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल (esha deol) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. २०१२ मध्ये उद्योगपती भरत तख्तानीसोबत लग्नगाठ बांधलेल्या ईशाने नुकताच त्याच्यासोबत काडीमोड घेतला आहे. लग्नाच्या तब्बल ११ वर्षानंतर ही जोडी विभक्त झाली आहे. ईशा आणि भरत विभक्त झाल्यानंतर त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. याविषयी ईशाने तिची प्रतिक्रियादेखील दिली होती.विशेष म्हणजे ईशा आणि भरत विभक्त झालेत याची कल्पना तिच्या दोन्ही लेकींना नसल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

अलिकडेच ईशाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आणि भरतच्या घटस्फोटाविषयी भाष्य केलं. यावेळी सोशल मीडियावर तुझ्याविषयी किंवा तुमच्या घटस्फोटाविषयी ज्या बातम्या येतात त्या तुमच्या लेकींनी वाचल्या आहेत का? असा प्रश्न ईशाला विचारण्यात आला. त्यावर, तिने मुलींना याची कल्पना नसल्याचं सांगितलं.

आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत अनभिज्ञ आहेत ईशाच्या लेकी

"माझ्या दोन्ही मुली फार लहान आहेत. ज्यावेळी मी वयात येत होते त्यावेळी मी सुद्धा न्यूज पेपर वाचायचे. त्यामुळे त्यावेळी जे वाचायचे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. आता जेव्हा माझ्या मुली भरत आणि माझ्याविषयी वाचतील त्यावेळी त्या जे प्रश्न विचारतील त्याची मी उत्तर देईन. या सगळ्यासाठी मी स्वत:ला तयार केलं आहे. पण, सध्या तरी तशी काही परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे आमच्या घटस्फोटाविषयी माझ्या मुलींना काहीही माहित नाही", असं ईशा म्हणाली.

दरम्यान, घटस्फोटानंतर ईशाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. बऱ्याच वर्षानंतर तिने पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टीसोबत ‘हंटर टूटेगा नही तोडेगा’ या सीरिजमध्ये ती झळकली आहे. ईशाने २००२ मध्ये 'कोई मेरे दिल से पुछे' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘ना तुम जानो ना हम’, ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, दस’, ‘नो एंट्री’, ‘शादी नंबर 1’ या सिनेमांमध्ये झळकली.

टॅग्स :इशा देओलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा