Join us

Drishyam 2 : आता रंगणार माइंड गेम! ‘दृश्यम 2’मधील अक्षय खन्नाचा फर्स्ट लुक रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:13 IST

Drishyam 2 : गुरूवारी ‘दृश्यम 2’मधील तब्बूचा लुक रिलीज करण्यात आला होता. आता अक्षय खन्नाचा लुक रिलीज करण्यात आला आहे.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ‘दृश्यम 2’चा (Drishyam 2 ) टीझर रिलीज झाला होता. विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची झलक दाखवत, या टीझरमध्ये ‘दृश्यम’च्या आठवणी ताज्या करण्यात आला होता. आयजी मीराच्या मुलाचा मृतदेह कुठे आहे, हे विजय साळगावकरशिवाय कुणालाही ठाऊक नाही. पण आता कदाचित या रहस्यावरून पडदा उठणार आहे. ‘दृश्यम 2’मध्येअक्षय खन्नाची (Akshaye Khanna) एन्ट्री झाली आहे.

गुरूवारी ‘दृश्यम 2’मधील तब्बूचा लुक रिलीज करण्यात आला होता. आता अक्षय खन्नाचा लुक रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये अक्षय खन्ना गंभीर दिसतोय, त्याच्या समोर बुद्धिबळाचा पट मांडलेला दिसतोय. ‘दुश्मन को हराने का मौका अक्सर दुश्मन आपको खुद देता है,’ असं हे पोस्टर शेअर करताना  लिहिलं आहे.

हे पोस्टर पाहून युजर्स क्रेझी झाले आहेत. अक्षयचं पात्र सिनेमात विजय साळगावकरचा रहस्यभेद करणार, असा कयास व्यक्त होत आहे.‘दृश्यम 2’मध्ये अजय देवगणसोबत  अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता लीड रोलमध्ये आहेत. अभिषेक पाठकने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे.

‘दृश्यम’हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. हा 2013 मध्ये रिलीज झालेल्या एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक होता. ‘दृश्यम 2’ हा सुद्धा मल्याळम सिनेमाचाच हिंदी रिमेक आहे. चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. एका हत्या प्रकरणामुळे विजयचं कुटुंब अडचणीत येतं. विजय अतिशय शिताफीनं त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून वाचवतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाºया या चित्रपटानं चाहत्यांना वेड लावलं होतं.   याचा सीक्वल येणार प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 

टॅग्स :दृश्यम 2अक्षय खन्नाअजय देवगणतब्बूबॉलिवूड