Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोत बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 12:04 IST

फोटोत बहिणीसोबत उभा असलेला हा चिमुकला आज मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनत्यांपैकी एक आहे. तुम्ही ओळखलंत का त्याला?

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्याचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहिल्यावर त्याला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. या फोटोमध्ये बहिणीसोबत उभा असलेला चिमुकला साईंकित कामत आहे. रात्रीस खेळ चाले 3 मध्ये अभिरामच्या भूमिकेत साईंकित कामत दिसत आहे. याआधीच्या 'रात्रीस खेळ चाले' दोनही सीझनचा भाग साईंकित होता. साईंकित सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. 

आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.  छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अभिराम या भूमिकेतून तो घराघरात पोहचला होता. छोट्या पडद्यावर नशीब आजमवल्यानंतर  साईंकित रूपेरी पडद्यावर मिरांडा हाऊस सिनेमातून एंट्री घेतली होती.  

 

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३टिव्ही कलाकार