Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का?; 'कारभारी लयभारी' या मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:48 IST

Marathi actress: मराठी कलाविश्वात तिने फार कमी काळात तिचं स्थान निर्माण केलं आहे.

सोशल मीडिया हे माध्यम आज कलाकार आणि चाहते यांच्या भेटीचं एक उत्तम माध्यम झालं आहे. कलाकार त्यांच्याविषयीचे अपडेट या माध्यमातून चाहत्यांना देत असतात. यात बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या प्रोफेशनल तर कधी पर्सनल आयुष्यातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या बहिणीसोबत दिसून येत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यावर अनेक जण ती कोण असावी याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कारभारी लयभारी, 36 गुणी जोडी यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री अनुष्का सरकाटे हिचा आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रीय असून तिने तिच्या बहिणीसोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. अल्पावधीत अनुष्काने मराठी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. कारभारी लयभारी, 36 गुणी जोडी, श्री लक्ष्मीनारायण या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी