Join us
Daily Top 2Weekly Top 5

ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 12:50 IST

कंगना रनौतच्या एका फॅनने तर दिलजीतला सल्ला दिलाय. दिलजीत यावर संतापला आणि त्याने कंगनाच्या फॅनची चांगलीच शाळा घेतली.

दिलजीत दोसांज आणि कंगना रनौत आजही सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहेत. आता भलेही दोघांनी एकमेकांच्या ट्विटवर रिप्लाय देणं बंद केलं असेल, पण आता त्यांचे फॅन्स आपसात भिडले आहेत. कंगना रनौतच्या एका फॅनने तर दिलजीतला सल्ला दिलाय. दिलजीत यावर संतापला आणि त्याने कंगनाच्या फॅनची चांगलीच शाळा घेतली.

कंगनाचा फॅन ट्विटमध्ये काय म्हणाला....

कंगनाच्या फॅनने ट्विट करत लिहिले की, 'दिलजीत तुम्ही तुमचं संपूर्ण करिअर गमावलं आहे. मी कंगनाचा प्रशंसक नाही. पण प्रत्येकजण या गैरसमजात आहेत की, तिला काय म्हणायचं होतं. ती तुमची सिनिअर आहे आणि तुम्ही तिला 'तू' म्हणण्याऐवजी सन्मान दाखवायचा असता'. (Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले....)

दिलजीतने दिलं उत्तर

दिलजीतही गप्प बसणारा नाही. त्यानेही या कंगनाच्या या फॅनची चांगलीच शाळा घेतली. दिलजीतने लिहिले की, 'सीनिअर? जेव्हा कंगना आपला वयोवृद्ध आईबाबत चुकीचं बोलत होती तेव्हा कुठे गेला होतास. तिला तिच्यापेक्षा मोठ्यांसोबत बोलण्याची अक्कल आहे का? आणि सांगतोय सीनिअरबाबत. करिअरची चिंता तू नको करूस, मी ते बघून घेईन. तुम्ही तुमच्या मॅडमला सांभाळा'. (मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली')

दरम्यान, दिलजीत दोसांज आणि कंगना रनौत यांच्यातील वाद चांगलाच वाढला होता. दोघांनी एकमेकांना चांगलंच खरं-खोटं सुनावलं होतं. हा सगळा वाद कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत अपशब्द वापरल्याने सुरू झाला होता. कंगनाने एक फेक फोटो ट्विट केला होता. नंतर ते ट्विट डिलीट केलं होतं. यामुळे कंगनाला ट्रोल व्हावं लागलं होतं. पण कंगना काही चूक मान्य करायला तयार नाही.

अनेक सेलिब्रिटी कंगनाच्या विरोधात

यावरूनच दिलजीत भडकला होता. दिलजीत सोबतच अनेक पंजाबी गायक, कलाकार, बॉलिवूडचे कलाकार कंगनावर टीका करत होते. अनेकजण दिलजीतच्या सपोर्टमध्ये समोर आले होते. अजूनही कंगनाला मोठ्या विरोधाचा सामना सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :दिलजीत दोसांझकंगना राणौतबॉलिवूडसोशल मीडिया