Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलने आलियाला दाखवला 'बेबी बॉय'चा फोटो? अभिनेत्रीची क्युट रिॲक्शन व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:24 IST

आलिया भट आणि विकी कौशल नुकतेच फिल्मफेअर ओटीटी २०५ पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र दिसले

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर ओटीटी २०२५ पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ओटीटीसह बॉलिवूड कलाकारही सोहळ्याला उपस्थित होते. विकी कौशल, अनन्या पांडे, सान्या मल्होत्रा, आलिया भट यासह अनेकांनी लक्ष वेधून घेतलं. आलिया भटची एन्ट्री होताच आधी तिने विकीची गळाभेट घेतली. दरम्यान आलिया विकीच्याच बाजूला बसली असता तिने ज्युनिअर कौशलचा फोटो पाहिल्याची चर्चा आहे. आलियाच्या क्युट रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफने ७ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. कौशल कुटुंबात छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यानंतर विकी कौशल पहिल्यांदाच सर्वांसमोर आला. फिल्मफेअर ओटीटी २०२५ पुरस्कार सोहळ्याला त्याने हजेरी लावली. ब्लॅक सूट बूटमध्ये तो हँडसम दिसत होता. नंतर आलिया भटही सोहळ्याला पोहोचली. ब्लॅक गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तिची एन्ट्री होताच  आधी तिने विकीची गळाभेट घेतली. तसंच इतरांचीही विचारपूस केली. बाजूला बसलेल्या अनन्या पांडेशी तिने गप्पा मारल्या. तर थोड्यावेळाने ती आणि विकी कौशल बाजूला बसले. त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये आलिया भटच्या चेहऱ्यावर क्युट रिअॅक्शन आहेत. तर विकी तिला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवताना दिसतोय.

या फोटोवरुन नेटकऱ्यांनी अंदाज लावला की विकीने आलियाला बेबी बॉयचा फोटो दाखवला आहे. ज्युनिअर कौशलला बघूनच आलियाने अशी रिअॅक्शन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 

कतरिना आणि विकी आईबाबा झाल्यावर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. आधी आलियाने लेकीला जन्म दिला. नंतर दीपिका पादुकोणलाही मुलगी झाली. काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणी आणि पत्रलेखानेही मुलीला जन्म दिला. वरुण धवनही गोंडस मुलीचा बाबा झाला. तर आता कतरिनाने मुलाला जन्म दिला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या अनेक जोडपी वैयक्तिक आयुष्यातील या नव्या टप्प्याचा अनुभव घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vicky Kaushal Shows Baby Photo to Alia Bhatt; Cute Reaction Viral

Web Summary : At an awards show, Vicky Kaushal reportedly showed Alia Bhatt a photo of his newborn. Alia's cute reaction sparked social media buzz. Katrina Kaif recently gave birth to a baby boy, adding to the list of Bollywood stars embracing parenthood.
टॅग्स :विकी कौशलआलिया भटबॉलिवूड