Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांनी आदित्य नारायणला दिला लग्न न करण्याचा सल्ला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 11:50 IST

झी टीव्हीवरील सिंगिंग रिॲलिटी शो 'सा रे ग म प'ला टॉपचे सात स्पर्धक मिळाले आहेत. या कार्यक्रमात नुकताच योग गुरू बाबा रामदेव आले होते

ठळक मुद्देहा सल्ला रामेदव बाबांकडून खरंच अनपेक्षित होता

झी टीव्हीवरील सिंगिंग रिॲलिटी शो 'सा रे ग म प'ला टॉपचे सात स्पर्धक मिळाले आहेत. या कार्यक्रमात नुकताच योग गुरू बाबा रामदेव आले होते.  स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून बाबा रामदेव अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहनही दिले. जेव्हा दादीजींनी (दीपाली बोरकर) रामदेव बाबांनी ह्या शो चा सूत्रधार आदित्या नारायणला लग्नाबद्दल काही सल्ला द्यायला सांगितला, तेव्हा योग गुरू म्हणाले, “ह्या जगातील सर्व प्रसिद्ध लोक अविवाहीत आहेत. मी योग गुरू बनलो आहे आणि मी ही अविवाहीत आहे. त्यामुळे मी म्हणेन की आदित्यने कधीच लग्न करू नये. हा सल्ला रामेदव बाबांकडून खरंच अनपेक्षित होता.”

एवढेच नाही तर स्पर्धक सोनू गिलच्या ‘चक दे इंडिया’वरील जबरदस्त परफॉर्मन्सनंतर त्याच्या पत्नीने मंचावर येऊन बाबा रामदेव यांच्याकडे सोनूसाठी वजन कमी करण्याचा सल्ला मागितला. बाबा रामदेव यांनी तात्काळ मंचावर जाऊन कपालभारती करून दाखवले आणि त्याला भरपूर गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला. तणावाखाली शांत राहण्याचा तसेच अनुलोम विलोम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. स्पर्धकांनी आपल्या सुंदर आणि जबरदस्त परफॉर्मन्सेससह ही संध्या खरंच मजेदार बनवली. ‘शो मी युअर जलवा’ वरील तन्मय चतुर्वेदीच्या परफॉर्मन्सने मेंटॉर रिचा शर्मा थक्क झाली. ‘जग घुमेया’ वरील ईशिताच्या गोड परफॉर्मन्समुळे मेंटॉर शेखर रावजिआनी स्वतः मंचावर आला आणि त्याने तिच्यासोबत परफॉर्म केले. याशिवाय, बाबा रामदेव यांनी ये देश मेरे कण में है हे गीत अन्य स्पर्धकांसोबत गायले. एकूण सा रे ग म प चा हा भाग अतिशय मनोरंजक आणि खरोखरीच श्रवणीय संगीताचा ठरला.

 

टॅग्स :आदित्य नारायणरामदेव बाबासा रे ग म प