Join us

'आता पुढचा प्रवास हिच्यासोबत'; किरण गायकवाडने पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 10:53 IST

Kiran Gaikwad: उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किरणला खरी लोकप्रियता देवमाणूस या मालिकेमुळे मिळाली.

'लागिरं झालं जी'(lagir zal ji), 'देवमाणूस' (devmanus)अशा गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड (Kiran Gaikwad). उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किरणला खरी लोकप्रियता देवमाणूस या मालिकेमुळे मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर तो कायम चर्चेत असतो. किरणचा अल्पावधीत प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असून त्याच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच आता किरणने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. 

किरण गायकवाडने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या नव्या पाहुण्याची ओळख करुन देताना त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत आहे.

डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केलंय एकत्र काम

किरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या घरचा नवा पाहुणा म्हणजे त्याची नवी कोरी करकरीत कार आहे. किरण गायकवाडने पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी खरेदी केली असून ही गुडन्यूज त्याने चाहत्यांना दिली आहे.

"आता पुढचा प्रवास हिच्यासोबत "असं कॅप्शन देत त्याने त्याच्या नव्या कारसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. किरण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

टॅग्स :किरण गायकवाडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार'देवमाणूस २' मालिका