Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवारांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, म्हणाल्या- "त्याला अजितदादांना भेटायचं आहे, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 15:36 IST

रोहितने नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रोहित मानेने भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. अनेक नवोदित कलाकारांना हास्यजत्रेमुळेच प्रसिद्धी मिळाली. अभिनेता रोहित मानेदेखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. सातारी ठसका दाखवत आणि विनोदाचं टायमिंग जुळवत रोहित प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. रोहितने नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. 

रोहित मानेने भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. सुनेत्रा पवार यांनी इन्स्टाग्रामवरुन फोटो पोस्ट केले आहेत. पोस्टमधून त्यांनी रोहित मानेच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

सुनेत्रा पवारांनी केलं रोहित मानेचं कौतुक

"लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हे पुण्याईचेच काम. ते पुण्यकर्म आपल्या विनोदी अभिनयातून करणाऱ्या रोहित माने या अभिनेत्याची झालेली भेट आनंददायी.आमचे सहकारी धनवान वदक देशमुख हे रोहितचे नातेवाईक. त्यांच्याकडे रोहितने दादा, वहिनींना भेटता येईल का? अशी विचारणा केली. त्यामुळे ते रोहितला घेऊन भेटायला आले. प्रवासात वेळ मिळाला, की काही ना काही वाचत, पाहत, ऐकत असते. त्यावेळी हास्यजत्रा पाहताना रोहित व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सादरीकरण हास्याची बरसात करणारे असते. त्याच आनंदाने रोहितशी गप्पा झाल्या. त्यामधे त्याचा नाटक, चित्रपट आणि हास्यजत्रा मधील प्रवास उलगडला. या भेटीबद्दल त्याने आनंद व्यक्त केला", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रोहित मानेने अजित पवारांना भेटण्याची इच्छाही सुनेत्रा पवार यांना बोलून दाखवली. सुनेत्रा पवार यांनी रोहित आणि अजित पवारांची भेट घडवून आणणार असल्याचं आश्वासन अभिनेत्याला दिलं आहे. पोस्टमध्ये पुढे त्या म्हणतात, "त्याला अजितदादांना देखील भेटायचे आहे. ती भेट नक्की घडवण्याचे त्याला सांगून त्याला व त्याच्यापाशी त्याच्या सर्व सहकलाकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या".

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासुनेत्रा पवारटिव्ही कलाकारमराठी अभिनेता