Join us

CDS Bipin Rawat Helicopter Crash: 'दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची भेट झाली होती...'; बॉलिवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 19:50 IST

Bipin rawat: बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे.

भारतीय संरक्षण दलाचे सीडीएस (CDS) बिपीन रावत  (bipin rawat)  यांचं एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. भारतीय हवाई दलाचं हे हेलिकॉप्टर वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे.

"जनरल रावत यांच्या निधनाचं प्रचंड दु:ख होतंय. दोन आठवड्यांपूर्वीच दिल्लीत त्यांची भेट झाली होती. ज्यावेळी त्यांनी पोलो मॅचनंतर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. त्यांच्याकडे पाहून मी फार प्रभावित झालो होतो.#IndianArmy RIP", असं ट्विट अभिनेता कबीर बेदी यांनी केलं. कबीर बेदी यांच्यासोबतच अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

"जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार वाईट वाटतंय. सर, तुम्ही गेल्या ४ दशकांपासून ज्या पद्धतीने निस्वार्थपणे देशसेवा केली त्यासाठी आमच्या सगळ्यांचा तुम्हाला मानाचा मुजरा. देशातील सर्वोत्तम सैनिकांपैकी एक गमावल्यामुळे देश ज्या दु:खात बुडाला आहे. त्या शोकसागरात मी सहभागी आहे. RIP #ओमशांति”, असं विवेक ओबेरॉय म्हणाला.

"दु:खद...त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..त्यांनी देशासाठी जे कार्य केलं त्याला मनापासून सलाम", असं ट्विट लेखक आणि फिलममेकर Resul Pookutty यांनी केलं आहे. 

दरम्यान, विवेक ओबेरॉय, कबीर बेदी यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रणौत आणि सोफी चौधरीने देखील बिपीन रावत यांना आदरांजली वाहिली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बिपीन रावत Mi सीरिजच्या सुलुर (Sulur) या हेलिकॉप्टरने आर्मी बेसवरुन भरारी घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. 

टॅग्स :बिपीन रावतबॉलिवूडसेलिब्रिटीकबीर बेदीविवेक ऑबेरॉयकंगना राणौत