ठळक मुद्देरिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी दीपवीर कालच बेंगळुरू येथे पोहोचले. बेंगळुरू विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या रिसेप्शनमध्ये केवळ कुटुंबीय व अतिशय जवळच्या मित्रांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या रिसेप्शनची तयारी जोरात सुरु आहे. आज दीपिकाचे होमटाऊन बेंगळुरु येथे दीपवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले आहे. या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी दीपवीर कालच बेंगळुरू येथे पोहोचले. बेंगळुरू विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बेंगळुरूमधील दीपिकाचे घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवदांम्पत्याच्या स्वागतासाठी कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही, हेच या फोटोंवरून दिसते.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}} या रिसेप्शनमध्ये केवळ कुटुंबीय व अतिशय जवळच्या मित्रांना निमंत्रित करण्यात आले आहे. दीपिकाचे आई-वडिल जातीने रिसेप्शनच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. काल दीपिकाने लग्नाचे अनेक फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून प्रत्येकजण दीपवीरच्या प्रेमात पडले.
आता दोघांच्या रिसेप्शनचे फोटो पाहायला मिळावेत, यासाठी चाहते उत्सूक आहेत. अर्थात त्यासाठी चाहत्यांना काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, आज २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.