Join us

'किंग'मध्ये 'ही' अभिनेत्री असणार सुहानाची आई? अनेक सिनेमांमध्ये शाहरुखसोबत केलाय रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:44 IST

'किंग' सिनेमात आधीच अभिषेक बच्चन, अभय वर्मा यांचीही भूमिका आहे. तर आता 'या' अभिनेत्रीचा कॅमिओ असणार आहे.

शाहरुख खान लाडकी लेक सुहानासोबत (Suhana Khan) आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'किंग' (King) सिनेमाचं सध्या जोमात चित्रीकरण सुरु आहे. 'पठाण' आणि 'वॉर' सारखे सिनेमे बनवणारे सिद्धार्थ आनंद 'किंग'चं दिग्दर्शन करणार आहेत. आता सिनेमाबाबतीत आणखी एक अपडेट समोर आलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील 'किंग'मध्ये दिसू शकते अशी चर्चा आहे. दीपिकाची भूमिका नक्की काय असणार?

पीपिंग मूनने दिलेल्या रिपोर्टनुसार, शाहरुख (Shahrukh Khan) आणि सुहानाच्या (Suhana Khan)  'किंग'मध्ये दीपिका पदुकोणची (Deepika Padukome) एन्ट्री होणार आहे. दीपिका यामध्ये सुहानाच्या आईच्या भूमिकेत दिसेल. तसंच ती शाहरुखची पूर्वप्रेमिका असणार आहे. दीपिकाचा हा कॅमिओ असणार आहे. शाहरुख आणि सिद्धार्थला या भूमिकेसाठी दीपिकालाच घ्यायचं होतं. दोघांनी विचारणा केल्यानंतर तिनेही लगेच होकार दिला. एकंदर सिनेमाची कहाणी काय असेल आणि सुहानाच्या आईच्या भूमिकेत ती कशी दिसेल हे बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दीपिकाने याआधी 'जवान'मध्येही कॅमिओ केला होता. तिने शाहरुखच्या बायकोची आणि डबल रोलमध्ये असलेल्या शाहरुखच्याच आईची भूमिका साकारली होती. यासह शाहरुख-दीपिकाने 'ओम शांती ओम',  'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर', 'पठाण' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.  'किंग' मध्ये शाहरुख, दीपिका सुहाना यांच्याशिवाय अभय वर्मा आणि अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक यामध्ये मुख्य खलनायक असणार आहे. 

अनेक मीडिया रिपोर्टनुसार, 'किंग'ची कहाणी ही बदल्यावर आधारित असणार आहे. २००० साली बॉबी देओल आणि राणी मुखर्जीचा 'बिच्छू' सिनेमा आला होता. जो फ्रेंच सिनेमा 'लियोन:द प्रोफेशनल' चा रिमेक होता. 'किंग'ही असाच असणार आहे ज्यात शाहरुखही ग्रे भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खानदीपिका पादुकोणबॉलिवूड