Join us

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोणचा पहिला रॅम्प वॉक, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:39 IST

सौंदर्य आणि फॅशन क्वीन म्हणून बॉलिवूडमध्ये दीपिकाची ओळख आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने ( Deepika Padukone )आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मेहनतीने चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. दीपिकाने तिच्या अनेक चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य तर सिद्ध केलेच पण बॉक्स ऑफिसवरही खळबळ उडवून दिली. सौंदर्य आणि फॅशन क्वीन म्हणून बॉलिवूडमध्ये तिची ओळख आहे. दीपिकानं आई झाल्यानंतर तिच्या लेकीच्या संगोपनासाठी कामातून ब्रेक घेतला होता. पण, आता दीपिका पुन्हा कामावर परतली आहे. 

 बॉलीवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या कारकिर्दीला नुकतीच २५ (Sabyasachi's 25th Anniversary Show) वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने भव्य फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिकाने लेकीच्या जन्मानंतर पहिला रॅम्प वॉक (Deepika Padukone Opens Sabyasachi's 25th Anniversary Show) केला. यावेळी तिनं आपल्या हटके स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकानं आकर्षक लूक केला होता. पांढरी पँट, टॉप आणि ट्रेंच कोट परिधान केला. यावर तिनं चोकर आणि रुबी-डायमंड क्रॉस पेंडेंट घातलं. तर हातात काळ्या रंगाचे लेदर ग्लोव्हज, ब्रेसलेट, हेडबँडमध्ये ती एकदम जबरदस्त दिसत होती. 

दीपिकाचा हा लूक चर्चेचा विषय बनला. एवढेच नाही तर फॅन पेजने व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिची तुलना सदाबहार सुपरस्टार रेखा यांच्याशी करायला सुरुवात केली आहे. याआधी रेखा यांनी सुद्धा अशाच प्रकारचा लूक केला होता. त्या अनेकदा विमानतळावर आणि पार्ट्यांमध्ये अशा लूकमध्ये पाहायला मिळाल्यात. दीपिका पदुकोणला या लूकमध्ये पाहून एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहलं,"ती दीपिका आहे की नाही हे ओळखण्यासाठी मला ५ मिनिटे लागली". तर एकाने लिहलं,  "मला वाटले ती रेखा आहे".

 

टॅग्स :दीपिका पादुकोणरेखासेलिब्रिटीबॉलिवूड