Join us

'माझी मानसिक स्थिती स्थिर नव्हती'; हृदयविकाराच्या झटक्यानंतर बिथरला होता सुनील ग्रोवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:32 IST

Sunil grover: जवळपास ४ बायपास सर्जरी केल्यानंतर सुनील या संकटातून सुखरुप वाचला.

आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा लोकप्रिय विनोदवीर, अभिनेता म्हणजे सुनील ग्रोवर (sunil grover ). अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सुनीलने वर्षभरापूर्वीच हृदयविकारच्या झटक्याचा सामना केला. मुंबईतील एशियन हार्ट इंस्टिट्यूट येथे त्याच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास ४ बायपास सर्जरी केल्यानंतर सुनील या संकटातून सुखरुप वाचला. त्यानंतर आता एका मुलाखतीमध्ये वर्षभरात त्याने कसा संघर्ष केला हे सांगितलं.

"मी आधीत कोविड पेशंट होतो त्या मला हृदयविकाराच झटका आला. त्यामुळे एक- दोन महिने माझी मानसिक स्थिती स्थिर नव्हती. मी घरी परत येईन की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. पण, सुदैवाने आता सगळं ठीक झालं आहे", असं सुनील म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "त्यावेळी माझी अवस्था खूप बिकट झाली होती. पण, आता सगळं व्यवस्थित झालं आहे आणि आता मला माझ्या कामाचा आनंदही घेता येतोय." दरम्यान, २०२२ च्या सुरुवातीलाच सुनीलला शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याविषयी चाहत्यांनाही सांगितलं होतं. 

टॅग्स :सुनील ग्रोव्हरसेलिब्रिटीसिनेमा