Join us

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवरने सुरू केलं सलूनचं दुकान? व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:43 IST

सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर सक्रीय असून तो व्हिडीओ शेअर करत असतो

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण त्यापेक्षाही त्याची एक खासियत आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणे. सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर सक्रीय असून तो व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे हे व्हिडीओ बऱ्याचदा चर्चेत येत असतात. दरम्यान आता कॉमेडियनने असाच आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हातात कात्री घेऊन लोकांचे केस कापणारा न्हावी म्हणून दिसला.

सुनील ग्रोव्हरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची केशकर्तन कला दिसून येत आहे. या व्हिडीओला त्याने "चौदहवीं का चाँद हो" हे  गाणे जोडले आहे.  व्हिडीओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे. तर सुनील ग्रोव्हर त्या व्यक्तीचा हेअरकट करताना दिसत आहे.  या व्हिडीओला त्याने 'संडे इज बेस्ट', असं कॅप्शन दिलं आहे. 

सुनिल अनेकदा असे हटके व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. याआधी त्याने लसून विकतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. पण, त्याच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  सुनीलच्या याच साधेपणावर चाहते फिदा असतात. 

सुनील ग्रोव्हर हा अभिनेता शाहरुख खानच्या  'जवान' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो नयनताराच्या सहाय्यक पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा अभिनेता 'सनफ्लॉवर' या वेबसिरीजमध्ये दिसला होता. आता चाहते 'जवान'मधील अभिनेत्याच्या दमदार अभिनयाची वाट पाहत आहेत.

 

टॅग्स :सुनील ग्रोव्हरबॉलिवूडव्हायरल फोटोज्