Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेता; एका दिवसाची फी ५ कोटी, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:20 IST

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने त्याच्या विनोदी शैलीने कायमच प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

Kapil Sharma : टेलिव्हिजन असो चित्रपट अभिनयच्या या जगतात हल्ली कलाकारांपेक्षा त्यांच्या कमाईची सर्वाधिक चर्चा रंगते. सध्याच्या घडीला बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु जेव्हा मालिका विश्वातील कलाकारांच्या मानधनाबद्दल चर्चा होते, तेव्हा मोजकीच नावे समोर येतात. 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली तसेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिलीप जोशी हे टीव्ही कलाकार एका एपिसोडसाठी भरमसाठ फी घेतात. त्यात छोट्या पडद्यावरील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत एक नवीन नाव सामील झालं आहे. कॉमेडियन कपिल शर्माने भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही कलाकारांच्या लिस्टमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. 

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास ५ कोटींहून अधिक मानधन आकारतो. या शोचा दुसरा सीझन सध्या चर्चेत आहे. दरम्यान, कपिल शर्मा ३०० कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचं सांगण्यात येतंय. 

कपिल शर्माची एकूण संपत्ती

कपिल शर्माचा मुंबईतील अंधेरी येथे एक आलिशान बंगला आहे. हाऊसिंग डॉट कॉम तसेच मॅजिकब्रिक्सनुसार या बंगल्याची किंमत १५ कोटी इतकी आहे. सध्या तिथे कपिल त्याच्या कुटुंबीयांसमवेत राहतो. अभिनेत्टाकडे वोल्वो XC90, एक मर्सिडीज-बेंज S350, एक रेंज रोवर इवोक सोबतच हाय कस्टम डिझाइन वॅनिटी वॅन असं कार कलेक्शन  आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कपिल शर्मा ३०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

ौकपिश शर्मा केवळ सूत्रसंचालनच नाही तर त्याच्या अभिनयामुळेही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 'किस किसको प्यार करूं' (२०१५), 'फिरंगी' (२०१७), 'ज्विगाटो' (२०२३) और 'क्रू' (२०२४) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा टिव्ही कलाकारसोशल मीडिया