Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इज्जतीचा कचरा करतात", चिडून उशी फेकली अन् छोटा पुढारी ढसाढसा रडला! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 08:55 IST

बिग बॉस मराठीच्या घरात काल भाऊचा धक्का झाल्यावर छोटा पुढारी ढसाढसा रडताना दिसला. असं काय घडलं

काल बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झाला. या धक्क्यावर रितेश भाऊंनी काही सदस्यांना चांगलंच सुनावलं तर काहींचं कौतुकही केलं. काल बिग बॉसच्या घरात रितेश देशमुखने सदस्यांसाठी एक नवीन खोली ओपन केली. तिचं नाव चक्रView. या खोलीत आपल्यामागे घरातले सदस्य काय बोलतात हे दाखवण्यात आलं. जेव्हा छोटा पुढारी  अर्थात घनःश्याम या खोलीत गेला तेव्हा त्याला अंकिता, पॅडी आणि धनंजय DP यांची एक क्लिप दिसली. "मला वाटतं त्याच्या सटासट कानाखाली वाजवावी", असं अंकिता छोटा पुढारीला म्हणाली होती. त्यावर छोटा पुढारीने राग व्यक्त केला. पण नंतर भाऊचा धक्का झाल्यावर तो ढसाढसा रडला. 

चिडून छोटा पुढारीने उशी फेकली अन्...

भाऊचा धक्का झाल्यावर छोटा पुढारी अरबाज, इरिना, वैभवसोबत गार्डन एरियात बसला होता. तो ढसाढसा रडत होता. रडत रडतच तो म्हणाला, "अरे दम आहे तर तोंडावर बोला ना. पॅडी दादा काय म्हणतात गुलाम आहे गुलाम. इज्जतीचा कचरा करतात." असं म्हणत घनःश्यामने उशी फेकली. अरबाजने त्याला शांत केलं. यावर वैभव म्हणाला, "अंकिता लय शहाणी झालीय." पुढे छोटा पुढारी अंकिताला उद्देशून म्हणतो,  "तिची एवढी लायकी आहे का. हिंमत आहे का तिची!"

पॅडी समजवायला आला तेव्हा काय झालं?

पुढे पॅडी छोटा पुढारीशी बोलायला येतो. छोटा पुढारी पॅडीला सांगतो, "मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीय." पुढे पॅडी शांतपणे त्याला सांगतो की, "रितेश भाऊ बोलले की पुढारी होतास कार्यकर्ता झालास. ते तुला का बोलले कारण तू इथे प्रत्येकाची कामं करतोय. मी तुला दिसलं ते बोललो. तुझ्या घरातल्या वाागण्यावरुन बोललो." पुढे घनःश्याम म्हणाला, "तुम्ही पण करता की कामं. फळं नेऊन दे. टिश्यू नेऊन दे. तुम्ही पण प्रत्येकाच्या बाजूने बोलता. तुम्ही मला सांगू नका कसं वागायचं ते. रितेशभाऊंनी सांगीतलंय तर मी सुधारणा करेन."

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुखअंकिता प्रभू वालावलकर