Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारी कथा, 'छोरी २'चा टीझर रिलीज, गश्मीर महाजनीची खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:53 IST

गश्मीर महाजनी, पल्लवी पाटील अशा कलाकारांची भूमिका असलेला 'छोरी २' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (chhorri 2)

२०२१ मध्ये रिलीज झालेला 'छोरी' (chhorii) हा सिनेमा चांगलाच गाजला. नुसरत भरुचाची सिनेमात प्रमुख भूमिका होती. हॉरर थ्रिलर असलेला सिनेमा हिंदी मनोरंजन विश्वात चांगलाच नावाजला गेला. अशातच 'छोरी' सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी अशी की, या सिनेमाचा सीक्वल अर्थात 'छोरी २'ची (chhorri 2) घोषणा करण्यात आली आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.

'छोरी २'चा टीझर

प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर 'छोरी २'चा टीझर शेअर केलाय. एक छोटी मुलगी हातात कंदिलाचा दिवा घेऊन विहिरीजवळ जाते. अचानक तिचा पाय ओढून तिला खेचण्यात येते. पुढे पडक्या घरात नुसरत भरुचाची एन्ट्री होते. त्यानंतर चेहऱ्यावर दुपट्टा घेऊन भूताच्या रुपात सोहा अली खान दिसते. एक मिनिटं अठ्ठावीस सेकंदांचा हा टीझर भयानक दृश्यांनी भरलेला आहे.  'छोरी २'मध्ये नुसरत भरुचासह अनेक नवीन कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सिनेमात खास भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेत्री पल्लवी अजयची खास भूमिका आहे.

 'छोरी २'कधी रिलीज होणार?

 'छोरी २'मध्ये पुन्हा एकदा साक्षीच्या व्यक्तिरेखेत नुसरत भरुचा झळकणार असून तिच्यासोबत मुख्य भूमिकेत सोहा अली खान दिसणार आहे. तसेच गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन आणि हार्दिका शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.  'छोरी २' सिनेमाचा खास प्रीमिअर भारत जगभरातील सुमारे २४० देशांतील प्रेक्षकांसाठी ११ एप्रिल २०२५ रोजी प्राइम व्हीडिओवर रिलीज होईल.

टॅग्स :नुसरत भारूचाबॉलिवूडगश्मिर महाजनीगश्मिर महाजनीसोहा अली खान