Join us

Chhaava: एक खिलाडी १० पे भारी! 'छावा'ने मोडले 'या' सिनेमांचे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:15 IST

Chhaava Box Office Collection Day 17: सिनेमा प्रदर्शित होऊन आता १७ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 

'छावा' सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा ज्वलंत इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. या सिनेमात विकी कौशले छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १७ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 

छावा सिनेमाने तिसऱ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार छावाने २४.२५ कोटींचा गल्ला जमवला. आत्तापर्यंत या सिनेमाने ४५८.७५ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर तिसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये छावा दुसऱ्या क्रमांकावर आहे. छावाने स्त्री २, बाहुबली २, गदर २, जवान, दंगल, अॅनिमल, पठाण, तान्हाजी, पीके या सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. पण, पुष्पा २चा रेकॉर्ड मोडणं मात्र या सिनेमाला जमलेलं नाही. पुष्पा २ने तिसऱ्या रविवारी २६.७५ कोटी कमावले होते. 

दरम्यान, 'छावा' सिनेमात विकी कौशलसोबतरश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. रश्मिकाने सिनेमात महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात मराठी कलाकारांचीही फौज आहे.  

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाबॉक्स ऑफिस कलेक्शन