आशा भोसले यांचं काल निधन झालं. छातीत संसर्ग झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. आशाताईंनी काहीच दिवसांपूर्वी भ्रमाचा भोपळा या मराठी नाटकाला हजेरी लावली होती. त्यावेळी अभिनेत्री चेतना भटने आशाताईंची भेट घेतली होती. त्या क्षणाचा फोटो पोस्ट करुन चेतनाने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. चेतनाने आशाताईंसोबतचा खास फोटो पोस्ट करुन लिहिलं की, ''तसं तर हल्ली माझी तब्येत बरी नसते, आज बऱ्याच दिवसांनी मी घराबाहेर पडले. बऱ्याच दिवसांनी ड्रामाबघितला... “ तुमचा आवाज अजूनही कानात घुमतोय. काही दिवसांपूर्वीच विलेपार्लेला आमच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाला तुम्ही आला होतात, आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत. आशाताई वंदन''
अशाप्रकारे चेतना भटने आशाताईंबद्दलची खास आठवण जागवली आहे. एकूणच आशाताईंचा सहवास मिळाल्याने चेतनाला त्याक्षणी खूप आनंद झाला होता. परंतु आशाताई आज आपल्यात नाही, याचे चेतनाला दुःख आहे. आज संध्याकाळी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसलेंचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती त्यांच्या निवासस्थानी सध्या आहेत. भावपूर्ण वातावरणात आशाताईंना निरोप देण्यात येत आहे.
Web Summary : Actress Chetana Bhat shared a heartfelt post about Asha Bhosle's recent visit to her play 'Bhramacha Bhopla'. Bhosle, who passed away, had blessed the cast. Bhat cherishes the memory and mourns the loss. Her last rites will be held in Mumbai.
Web Summary : अभिनेत्री चेतना भट ने आशा भोसले के हाल ही में उनके नाटक 'भ्रमचा भोपला' में आने के बारे में एक हार्दिक पोस्ट साझा की। भोसले, जिनका निधन हो गया, ने कलाकारों को आशीर्वाद दिया था। भट उस स्मृति को संजोती हैं और नुकसान पर शोक व्यक्त करती हैं। उनका अंतिम संस्कार मुंबई में किया जाएगा।