Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना कॉमेडी, ना अभिनय! 'चला हवा येऊ द्या' नंतर नव्या कार्यक्रमात श्रेयाची एन्ट्री; दिसणार वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 10:07 IST

Shreya bugade: आजवर श्रेयाने तिच्या विनोदीशैलीत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. परंतु, पहिल्यांदाच ती एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेता. हा कार्यक्रम संपल्यानंतर यातील कलाकार आता इतरत्र विखुरले असून प्रत्येक जण हिंदी-मराठी रिअॅलिटी शोमध्ये दिसून येत आहेत. यामध्येच चला हवा येऊ द्याची कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सुद्धा सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमात दिसून येत होती. परंतु, या कार्यक्रमानंतर श्रेयाचं पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण होणार आहे. एका नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

आजवर श्रेयाने तिच्या विनोदीशैलीत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. परंतु, पहिल्यांदाच ती एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. छोट्या पडद्यावर सुरु होणाऱ्या Drma Juniors  या नव्या कार्यक्रमात श्रेया बुगडे झळकणार आहे.

झी मराठीने Drma Juniors या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअक केला आहे. या प्रोमोमध्ये संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर यांच्यासोबत श्रेया देखील दिसून येत आहे. मात्र, या कार्यक्रमात श्रेया चक्क सूत्रसंचालिकेची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे तिला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, Drma Juniors या कार्यक्रमात बालकलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार असून श्रेया सुद्धा पहिल्यांदाच नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रेया लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच व्यावसायिकादेखील आहे. दादारमध्ये तिचं 'द बिग फिश अँड कंपनी' हे रेस्टॉरंटदेखील आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनश्रेया बुगडेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी