Join us

मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 17:00 IST

अभिनेता रणवीर सिंगने दीपिकाच्या प्रेग्नंसीपणावर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात (ranveer singh, deepika padukone)

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे रिअल लाईफ नवरा-बायको लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका सध्या गरोदर आहे. रणवीर पावलोपावली दीपिकाची काळजी घेताना दिसतो. रणवीर सिंग कधी इव्हेंटला दीपिकासोबत हात धरुन चालताना दिसतो. तर दुसरीकडे कधी एअरपोर्टवर रणवीर दीपिकाला सावरताना दिसतोय. अशातच मुलगा हवा की मुलगी या प्रश्नावर रणवीरने मौन सोडलंय. 

रणवीरला होणाऱ्या बाळाबद्दल विचारले प्रश्न, अभिनेता म्हणाला..

रणवीर सिंगचा सिनेमा 'जयेशभाई जोरदार'च्या प्रमोशनदरम्यान त्याने एकदा त्याला मुलगा हवा की मुलगी या प्रश्नाचे उत्तर दिले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर सिंग म्हणाला होता की, "मंदिरात जाताना विचारत नाही तुम्ही लाडू हवा की शिरा हे विचारत नाही. त्याचप्रमाणे, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात हेच म्हणेन, देव माझ्यासाठी जे काही ठरवेल त्यात मी आनंदी राहीन." अशाप्रकारे रणवीरच्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली.

दीपिकासारखं मूल हवं - रणवीर सिंग

रणवीर सिंगने या मुलाखतीत असंही म्हटले होते की, "मला दीपिकासारखे मूल हवे आहे. दीपिका लहान असताना खूप गोड होती. मी रोज तिचे बालपणीचे फोटो पाहतो आणि म्हणतो की, तूझ्यासारखे क्यूट बाळ मला दिलेस तर माझे आयुष्य चांगले होईल." अशाप्रकारे रणवीरने त्याच्या मनातली इच्छा व्यक्त केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका-रणवीर आई-बाबा होण्याची शक्यता आहे. काहीच दिवसांपूर्वी दीपिका 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाच्या लॉंचला सहभागी झाली होती. त्यावेळी तिचं बेबी बंप सर्वांना दिसलं. सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणमराठीबॉलिवूड