Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुहाना खानचा 'द आर्चीज' ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:34 IST

7  डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द आर्चीज' चित्रपट रिलीज होणार आहे.

झोया अख्तरचा आगामी सिनेमा 'द आर्चीज'ची सध्या विशेष चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

 

 

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

7  डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे. 'द आर्चीज' हा सिनेमा अमेरिकन लोकप्रिय कॉमिक्स 'द आर्चीज'वर आधारित असून 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे.  मैत्री,फ्रिडम, प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व 'द आर्चीज' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

 

 

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता असण्याचे आणखी एक कारण म्हणजे शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे. खुशी कपूर बेट्टीच्या तर अगस्त्य नंदा आर्चिजच्या टायटल रोलमध्ये दिसणार आहे. तर वेदांग रैना, मिहिर आहूजा, डॉट आणि युवराज मेंडा हे नवोदित कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

टॅग्स :बॉलिवूडसुहाना खानखुशी कपूरसिनेमा