Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सिनेमा प्रॉब्लेमॅटिक होताच, मी नाकारत नाही...", 'रांझणा' सिनेमावर झिशान अय्यूब स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:27 IST

मी तेव्हाही सिनेमाच्या कथेचा बचाव केला नव्हता आणि आजही करणार नाही..., असं का म्हणाला झिशान अय्यूब

२०१३ साली आलेला धनुष आणि सोनम कपूरचा 'रांझणा' कल्ट सिनेमा ठरला. आनंद एल राय दिग्दर्शित सिनेमाने सर्वांना प्रेमातच पाडलं. सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय, ए आर रहमानची गाणी सगळंच गाजलं. पण या सिनेमाला तेवढीच नावंही ठेवली गेली. सिनेमात एकतर्फी प्रेमाची टॉक्झिक लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. सिनेमात मुरारीच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता झिशान अय्यूबनेही यावर सहमती दर्शवली आहे. त्याने 'रांझणा' कथेवर मत मांडलं आहे.

'द शीरोज टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत झीशान अय्युब म्हणाला, "सिनेमावर आक्षेप घेतला गेला होता. मी तेव्हाही सिनेमाच्या कथेचा बचाव केला नव्हता आणि आजही करणार नाही. अनेकांनी सिनेमाच्या बचावासाठी मुद्दे मांडले. पण मी कधीच त्या सिनेमाची कथा योग्य असल्याचं म्हटलं नाही. मी तेव्हाही अनेक ठिकाणी बोललो होतो की हो, एकतर्फी प्रेम ही प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे ज्याला प्रमोट केलं जात आहे. यामध्ये ज्याप्रकारे एकतर्फी प्रेमातला क्रोध दाखवण्यात आला आहे त्याचं नक्कीच उद्दात्तीकरण होऊ शकत नाही. ते नक्कीच चुकीचं होतं आणि कोणीही त्या गोष्टीचा बचाव करत असेल तर ते चुकीचं आहे."

तो पुढे म्हणाली, "यावर बोललं जाणं खूप गरजेचं आहे. मी फिल्मला जस्टीफाय करत नाही. तसंच ही कशी वाईट गोष्ट आहे आणि यावर चर्चा व्हायला हवी असाही सिनेमाचा उद्देश नव्हता. पण  त्यावर जी चर्चा झाली ती होणं खूप आवश्यक होतं."

आनंद एल राय यांचा 'तेरे इश्क मे' सिनेमात नुकताच रिलीज झाला आहे. यातही धनुषची भूमिका आहे आणि क्रिती सेनन अभिनेत्री आहे. या सिनेमातही एकतर्फी प्रेमाचीच टॉक्झिक गोष्ट ज्याची आता पुन्हा चर्चा होत आहे. तसंच सिनेमात मुरारी म्हणजे झिशान अय्युबच्या कॅमिओने लक्ष वेधून घेतलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Zeeshan Ayyub admits 'Raanjhanaa' was problematic, defends discussion it sparked.

Web Summary : Zeeshan Ayyub acknowledges 'Raanjhanaa's' problematic portrayal of toxic, one-sided love. He maintains he never defended the film's romanticization of such themes, emphasizing the importance of discussing its impact. He welcomes the discussions it started.
टॅग्स :धनुषबॉलिवूडसिनेमा