Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीनत अमान यांचा तरुणांना सल्ला; म्हणाल्या, 'नात्यात शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी...';

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:23 IST

Zeenat aman: जीनत अमान यांनी महिला सशक्तीकरणावरही भाष्य केलं आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जीनत अमान. उत्तम अभिनयशैली आणि बेधडकपणा यामुळे जीनत अमान कायम चर्चेत राहिल्या. आता त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर कायम त्यांची चर्चा रंगत असते. यामध्येच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणांना रिलेशनशीपविषयी एक सल्ला दिला. या सल्ल्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

जीनत अमान यांनी तरुणांना रिलेशनशीपविषयी दिलेला सल्ला सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. त्यांनी रिलेशनशीपविषयी बोलत असतानाच शरीरसंबंधांविषयीदेखील भाष्य केलं. त्यामुळे त्यांचं वक्तव्य सर्वाधिक चर्चेत आलं आहे. ज्या अभिनेत्रीने तरुणांना रिलेशनशिपचा सल्ला दिला आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जीनत अमान आहे. जीनत अमान बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच झालेल्या एका शोमध्ये जीनत अमान यांनी तरुणांनी रिलेशनशिप आणि डेटिंगबद्दल काही महत्त्वाचं सल्ले दिले आहेत.

"मला एका गोष्टीची खंत वाटते. पण, मला असं वाटतं नात्यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी काही काळ वाट पाहायला हवी. एवढंच नाही तर, स्वत: वर ताबादेखील असायला हवं. दोन्ही पार्टनरने हा संयम ठेवला पाहिजे. कारण, नातं फार नाजूक आणि अनमोल असतं. त्यामुळे त्याला टिकवून ठेवणं तितकंच कठीण असतं", असं जीनत अमान म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "महिलांनी प्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवं. प्रत्येक महिलेने आत्मविश्वास बाळगला पाहिजे. स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यानंतर महिला आत्मनिर्भर होतात. इतकंच नाही तर त्या स्वत: त्यांचे निर्णय घेऊ शकतात."

दरम्यान, जीनत अमान यांनी वयाच्या १७ व्या वर्षी पैसे कमावण्यास सुरुवाक केली. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा रंगत असते.

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूडसेलिब्रिटी