Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी रात्रभर तिथे बसून होते अन् ते बिअर पित..'; जरीन खानने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:04 IST

Zareen khan: जरीनने 'अक्सर 2' च्या निर्माता आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहेत.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (salman khan) याने आजवर इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्रींना लॉन्च केलं आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे जरीन खान(Zareen khan). 'वीर' या सिनेमातून जरीनने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर फारशी चालली नाही. तिने अगदी मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु, जरीन सध्या तिच्या एका मोठ्या खुलाश्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने काही दिग्दर्शक, निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर जरीनची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिने 'अक्सर 2' च्या निर्माता आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहेत. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं तिने म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं जरीनसोबत?

या सिनेमात बोल्ड सीन नसतील असं मला सांगण्यात आलं होतं. पण, ऐनवेळी शुटिंगच्या काळात अनेक बदल करण्यात आले. निर्मात्यांनी मला छोटे कपडे घालायला प्रवृत्त केलं. तसंच किसिंग सीन सुद्धा वाढवले. इतकंच नाही तर सिनेमाचं प्रमोशन सुरु होतं त्यावेळी मला एका ठिकाणी बोलवण्यात आलं. यावेळी तुला फार काही करायचं नाहीये फक्त त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत असं सांगण्यात आलं, असं जरीन म्हणाली.

पुढे ती म्हणते, "पण तिथे असं काहीही झालं नाही. मी तिकडे रात्रभर बसून होते आणि निर्माते त्यांची पार्टी करण्यात, बिअर पिण्यात बिझी होते. तिथे मला भेटायला कोणीही आलं नाही. प्रत्येक जण पार्टी करण्यात बिझी होता. त्यामुळे मी तेथून निघाले.पण, मी जातीये हे पाहून त्यांनी माझ्याकडून माझ्या कारची चावी खेचून घेतली."

दरम्यान, जरीनने ‘अक्सर 2’ च्या निर्माते, दिग्दर्शकांवर केलेल्या आरोपांमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. ‘अक्सर 2’ हा सिनेमा २०१७ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमामध्ये तिच्यासोबत  गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला यांनी स्क्रीन शेअर केली होती. तर, सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं होतं.

टॅग्स :बॉलिवूडजरीन खानसलमान खानसेलिब्रिटीसिनेमा