Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध YouTuber भुवन बामनं खरेदी केली महागडी कार, किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 11:33 IST

युट्यूब स्टार भुवन बामनेदेखील एक लक्झरी कार खरेदी केली आहे.

सध्या बॉलिवूडपासून छोट्या पडद्यापर्यंतच्या सेलिब्रिटींमध्येकार खरेदीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अलीकडेच अभिनेता रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, कंगना रानौत आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. यातच युट्यूब स्टार भुवन बामनेदेखील एक लक्झरी कार खरेदी केली आहे.

भुवन बामने  स्वतःलाच एक नवीकोरी गाडी गिफ्ट केली आहे. भुवन बामने लँड रोव्हर डिफेंडर ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. भुवनने खरेदी केलेली नवीन लँड रोव्हर डिफेंडर 110 मॉडेल तीन वेगवेगळ्या इंजिन प्रकारांमध्ये येते. अशा स्थितीत या SUV ची किंमत 97 लाख ते 1 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, खुद्द भुवनने अद्याप कारशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

 'ताजा खबर' आणि 'धिंडोरा' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलेल्या भुवन बामचे यूट्यूबवर बरेच सबस्क्राइबर्स आहेत. त्याची गणना सर्वोत्तम YouTubers मध्ये केली जाते. भुवन बाम, भारतातील सर्वात मोठा कंटेट क्रिएटर आणि आता एक अभिनेता म्हणून नावारुपाला आला आहे. सामान्य घरातून येऊन ५ हजारांची नोकरी करणारा भुवन आज त्याच्या जिद्दीने, मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहचला आहे.

 वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'ताजा खबर'च्या सीझन 2 मध्ये दिसणार आहे. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, भुवन लवकरच 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मर्डर मिस्ट्री चित्रपटात दिसणार आहे. मात्र, मुख्य नायिकेचे नाव अद्याप समोर आलेले नाही. तसेच या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियाबॉलिवूडकार