Join us

मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनला कसा मिळाला 'सिंघम अगेन' सिनेमा? म्हणाला-"रोहित शेट्टींना भेटल्यावर त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:02 IST

सध्या मनोरंजन विश्वात रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Kshitij Patwardhan: सध्या मनोरंजन विश्वात रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ऐन दिवाळीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. १ नोव्हेंबरला 'सिंघम अगेन' थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. या चित्रपटाची कथा लिहण्याची धुरा सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय लेखक क्षितिज पटवर्धनने सांभाळली आहे. वेगवेगळे मराठी चित्रपट, नाटक, गाणी, जाहिरात, वेब सीरिज यांचं लेखन त्याने केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचं स्वप्न साकार झालं.

नुकतीच क्षितीज पटवर्धनने 'एबीपी माझाला' दिलेल्या मुलाखतीत अनेक किस्से सांगितले. त्यादरम्यान मुलाखतीत तो म्हणाला, "या टीममध्ये मी एकटाच नसून माझ्यासोबत ५ उत्तम लेखक आहेत. ज्यांनी 'सिंघम अगेन'च्या कथेला आकार दिला. मी हिंदीमध्ये  जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा निखिल मुसळे मराठी नावाचा  दिग्दर्शक आहे जो गुजरातमध्ये राहतो, ज्याने 'मेड इन चायना' नावाची फिल्म केली होती .त्याच्यासोबत मी 'सजनी शिंदे' नावाची फिल्म केली. त्यासाठी मी डायलॉग्स आणि अ‍ॅडिशनल स्क्रिनप्ले लिहला होता. तेव्हा त्याला विचारणा झाली की तुझ्या ओळखीत कुणी चांगला एका लेखक आहे का? आम्ही बघत आहोत. तर त्याने माझं नाव सूचवलं. त्यासोबत दुसरा रेफरंस होता करण व्यास याचा ज्यांने 'स्कॅम' लिहली आहे त्याला देखील विचारण्यात आलं".

पुढे क्षितीज म्हणाला, "सुदैवाने त्या दोघांनीही माझं नाव सजेस्ट केलं. मग माझी आणि रोहित शेट्टी सरांची भेट झाली. खूप अप्रतिम भेट होती. रोहित सर मराठी सिनेमांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी तेव्हा मी केलेले मराठी चित्रपटही पाहिले आणि त्याबद्दल ते मनमोकळेपणाने बोलले. खरंतर त्यांच्यामुळेच एक चांगली टीम तयार झाली". 

मोठं स्वप्न पूर्ण झालं

"मी २०१०-११ जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा थिएटरमध्ये पहिला पाहिलेला चित्रपट हा सिंघम होता. तर त्याची पोस्टही मला फेसबुक मेमरीमध्ये आली. याबाबत मी रोहित सरांनाही सांगितलं. तिथूनच मग या चित्रपटाचं कथासूत्र विणायला सुरूवात झाली". असा किस्सा क्षितीजने मुलाखतीत सांगितला. 

टॅग्स :रोहित शेट्टीबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी