Join us

स्वराच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबत 'मनमर्जिया' रायटर कनिकाचा साखरपुडा, दोघांनीही लिहिले सुपरहिट सिनेमे.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 13:10 IST

कनिकाने साखरपुड्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. फोटोत ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

मुव्ही रायटर कनिका ढिल्लनने रायटर हिमांशु शर्मासोबत साखरपुडा केलाय. कनिका आणि हिमांशु दोघांनीही बॉलिवूडमधील अनेक गाजलेले सिनेमे लिहिले आहेत. दोघांचाही साखरपुडा एका प्रायव्हेट सेरमनीमध्ये पार पडला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कनिकाने साखरपुड्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. फोटोत ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे हिमांशु ब्लू कुर्ता-पायजामा घालून आणि व्हाइट जॅकेट घालून हॅंडसम दिसतोय. फोटो शेअर करताना कनिकाने लिहिले आहे की, - #Famjam and more .. with #himanshusharma

कनिका आणि हिमांशु एक वर्षाापासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला. हिमांशुआधी कनिकाने फिल्ममेकर प्रकाश कोवलामुडीसोबत लग्न केलं होतं. २०१९ मध्ये दोघेही वेगळे झाले. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तेच हिमांशु अभिनेत्री स्वरा भास्करसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण ते दोघेही वेगळे झाले.

कोणते सिनेमे लिहिले?

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर हिमांशुने तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांझनासारखे सिनेमे लिहिले आहेत. तेच कनिका ढिल्ललने अनुराग कश्यपचा मनमर्जिया सिनेमा लिहिलाय. सोबतच तिने केदारनाथ, जजमेंटल है क्या आणि गिल्टीसारखे सिनेमेही लिहिले आहेत. तापसी पन्नूचा आगामी सिनेमा हसीन दिलरूबा सुद्धा कनिकाने लिहिला आहे.  

टॅग्स :बॉलिवूडलग्न