Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत लवकरच लग्न करणार? बोनी कपूर स्पष्टच म्हणाले- "नाही, असं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:53 IST

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहेत. या चर्चांवर आता जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले असून खरं काय ते सांगितलं आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहेत. या चर्चांवर आता जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले असून खरं काय ते सांगितलं आहे.

लग्नाच्या अफवांवर बोनी कपूर यांचे स्पष्टीकरणगेल्या काही काळापासून अशी चर्चा होती की, जान्हवी आणि शिखर या वर्षाच्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, बोनी कपूर यांनी 'इकोनॉमिक टाइम्स'शी बोलताना या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "नाही, हे खरे नाही". अशा प्रकारे त्यांनी सध्या तरी जान्हवी-शिखरचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवासजान्हवी आणि शिखर हे बालपणापासूनचे मित्र आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. २०१६ मध्ये त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा पहिल्यांदा समोर आल्या होत्या, परंतु दोघांनीही त्यावर अधिकृत भाष्य केले नव्हते.

 २०१८ मध्ये जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही काळातच ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. 'कॉफी विथ करण' या शोमध्येही जान्हवीने या विषयावर सूचक भाष्य केले होते. मात्र, २०२२ मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले आणि तेव्हापासून त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे. हे दोघं अनेकदा देवदर्शन, डिनर डेट आणि बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. त्यामुळे जान्हवी - शिखर आता लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Janhvi Kapoor wedding soon? Boney Kapoor clarifies relationship with Shikhar Pahariya.

Web Summary : Boney Kapoor denies rumors of Janhvi Kapoor marrying Shikhar Pahariya soon. Childhood friends, their relationship evolved, faced a separation, and reunited. Currently, no wedding plans exist.
टॅग्स :जान्हवी कपूरबोनी कपूरबॉलिवूडलग्न