Join us

विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- "सध्या मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:09 IST

विकी कौशल भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? याविषयी अभिनेत्याने 'छावा'च्या प्रमोशनदरम्यान त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय (chhaava, vicky kaushal)

विकी कौशलच्या 'छावा' (chhaava) सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. 'छावा'च्या रिलीज डेटला अवघा एक आठवडा बाकी आहे. 'छावा' सिनेमाचा टीझर, ट्रेलरनंतर आता प्रत्यक्ष सिनेमा पाहायला लोक उत्सुक आहेत. सध्या विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (laxman utekar) यांच्यासोबत 'छावा'च्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरतोय. या दरम्यान विकीला तो राजकारणात उतरणार का? असा प्रश्न विचारला असता विकीने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

विकी कौशल राजकारणात उतरणार?

विकी कौशल नुकतंच राजस्थानमधील राजमंदिर टॉकीजला सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी गेला होता. त्यावेळी विकीने तो आगामी काळात राजकारणात उतरणार का? या प्रश्नावर स्पष्टच म्हणाला की, "असं अजिबात मी करणार नाही. मला इंडस्ट्रीत नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली आहेत. अजून बरंच काही करायचं बाकी आहे. सध्या तरी मी अभिनयावर लक्ष केंद्रीत करणार आहे. प्रेक्षकांना उत्तमोत्तम सिनेमे देऊन त्यांचं मनोरंजन करणं हा माझा हेतू आहे."

विकी कौशलची 'छावा'मध्ये गर्जना

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. याशिवाय या सिनेमात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसणार आहे. सिनेमात संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे हे मराठी कलाकारही दिसणार आहेत. १४ फेब्रुवारी २०२२५ ला सिनेमा संपूर्ण जगभरात रिलीज होतोय.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्ना