Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओशो रजनीश यांच्यावर येणार बायोपिक? 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:58 IST

आचार्य ओशो रजनीश यांच्यावर बायोपिक येणार अशी चर्चा आहे (osho)

आचार्य ओशो रजनीश यांचे जगभरात असंख्य अनुयायी आहेत. ओशो यांच्यावर बॉलिवूडमध्ये बायोपिक येणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या बायोपिकमध्ये मिथुन चक्रवर्ती ओशो यांची भूमिका साकारणार अशी चर्चाही सुरु आहे. मिथुन यांचे वाढलेले केस, दाढी आणि बदललेला लूक पाहून ते ओशो यांच्यावर येणाऱ्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारतील असं चित्र दिसत होतं. पण आता मिथुन यांनीच सर्व चर्चांवर मौन सोडलं.

ओशो बायोपिकबद्दल काय म्हणाले मिथुन?

मिथुन यांनी एका मुलाखतीत याविषयी भाष्य केलंय. मिथुन म्हणाले की, "मला ओशोची भूमिका ऑफर झालीय पण काहीच कन्फर्म नाही. हा सिनेमा बनायला अजून ४-५ वर्ष लागतील."  'द काश्मिर फाइल्स' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मिथुन यांनी एक फोटोशूट केलेलं. हे फोटोशूट पाहून मिथुन ओशोची भूमिका साकारतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु मिथुन यांनी ओशो यांच्या बायोपिकबद्दल अजून काहीच निश्चित नाही,  असं सांगितलंय.

मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले की, "विवेक अग्निहोत्री यांची इच्छा आहे की, मी ओशो यांच्या बायोपिकमध्ये काम करावं. आणखी एका व्यक्तीने मला ओशो यांच्या भूमिकेची ऑफर दिली आहे. मला ही भूमिका साकारायची इच्छा आहे परंतु ही फार मोठी जबाबदारी आहे, याची जाणीवही आहे. ओशो यांचे फॉलोअर्स आजही त्यांना देवाच्या रुपात मानतात. ते खूप महान होते अन् मी सुद्धा त्यांचा आदर करतो." असं मत मिथुन चक्रवर्तींनी मांडलं. मिथुन यांचा आगामी 'द दिल्ली फाइल्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड