Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखने अक्षय कुमारसोबत कधी एकत्र काम का केलं नाही? किंग खानने केला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 10:41 IST

दोघांच्याही फॅन्सना अनेक वर्षांपासून पडलेल्या या प्रश्नाचा खुलासा शाहरूख खानने केला आहे. शाहरूखने यामागचं कारण सांगितलं जे फारच मजेदार आहे.

बॉलिवूड किंग शाहरूख खानने खुलासा केला आहे की, त्याने रूपेरी पडद्यावर अक्षय कुमारसोबत कधी काम का केलं नाही. दोघांच्याही फॅन्सना अनेक वर्षांपासून पडलेल्या या प्रश्नाचा खुलासा शाहरूख खानने केला आहे. शाहरूखने यामागचं कारण सांगितलं जे फारच मजेदार आहे.

शाहरूख खान आणि अक्षय कुमारबॉलिवूडमधील असे दोन दिग्गज आहेत जे त्यांच्या स्ट्रगल ते यशासाठी ओळखले जातात. दोघेही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. पण दोघांनी कधीच एकत्र सिनेमात केलं नाही. 'दिल तो पागल है'मध्ये अक्षय कुमारने केवळ कॅमिओ केला होता.

शाहरूख खानने अक्षय कुमारसोबत काम न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरूख खान म्हणाला की, 'मी काय आहे? मी त्याच्याप्रमाणे लवकर उठत नाही. जेव्हा तो जागणार असतो तेव्हा माझी झोपेची वेळ असते. त्याच्या दिवसाची सुरूवात लवकर होते. जेव्हा मी काम सुरू करतो तेव्हा तो पॅकअप करू घरी परतत असतो. मी रात्री जागणारा व्यक्ती आहे. माझ्याप्रमाणे इतरांना रात्री काम करण्याची सवय नाही'.

शाहरूख खान पुढे म्हणाला की, 'जर दोघांनी एखाद्या सिनेमात एकत्र काम केलं तर एकमेकांना भेटूच शकणार नाहीत. तो जात असेल तर मी येणार असेल. मला अक्षय कुमारसोबत काम करायची इच्छा आहे. पण आमचं टायमिंग मॅच नाही होणार'. हे सर्वांनाच माहीत आहे की, अक्षय कुमार वेळेचा किती पक्का आहे. सेट असो वा इव्हेंट अक्षय कुमार वेळेवर पोहोचतो आणि वेळेत काम संपवतो. 

टॅग्स :शाहरुख खानअक्षय कुमारबॉलिवूड