Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी त्यांचे कौतुक करते, पण त्या...? कंगना राणौतने अभिनेत्रींवर काढली भडास, पुरावाही दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 14:31 IST

Kangana Ranaut : माझ्या व माझ्या कामाबद्दल कट कारस्थान का? खोलात जाऊन विचार करा,’ असे ट्वीट  कंगनाने केले आहे.

ठळक मुद्देकंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा  येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  

सोशल मीडियावर नको इतकी अ‍ॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) आता बॉलिवूडच्या तमात अभिनेत्रींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. होय, आलिया भट, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, करिना कपूर अशा बड्या अभिनेत्रींना उद्देशून कंगनाने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत एक ट्वीट. मी सर्व अभिनेत्रींचे कौतुक करते. पण त्या मात्र कधीही ना माझे  कौतुक करत, ना कधी माझे समर्थन करत. असे का? असा सवाल तिने केला आहे. इतकेच नाही तर पुराव्यादाखल एक व्हिडीओही शेअर केला आहे.

‘इंडस्ट्रीची अशी कोणतीही अभिनेत्री नाही, जिचे मी कौतुक केले नाही, जिला मी पाठींबा दिला नाही. हा पुरावा आहे. पण त्यांनी मात्र कधीही ना माझे कौतुक केले, ना माझी पाठराखण. तुम्ही कधी विचार केला की, त्या सर्व माझ्या विरोधात का एकजुट झाल्या आहेत? माझ्या व माझ्या कामाबद्दल हे कट कारस्थान का? खोलात जाऊन विचार करा,’ असे ट्वीट  कंगनाने केले आहे.

यानंतर तिने आणखी एक ट्वीट केले. ‘तुम्ही पाहू शकता की, त्यांनी मला कॉल केला वा साधा मॅसेज पाठवला तरी मी त्यांच्या सिनेमांच्या प्रीमिअरला गेले. पण माझ्या सिनेमांच्या प्रीमिअरसाठी मी त्यांना कॉल केला की त्या साधा कॉलही उचलत नाहीत. त्यामुळे मी सतत त्यांचा क्लास घेत असते. त्या त्याच लायकीच्या आहेत,’ असे तिने यात म्हटले आहे. कंगनाचे हे ट्वीट सध्या तुफान व्हायरल होतेय.

कंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा  येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमात जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड