Join us

'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 14:11 IST

सध्या विक्की आपल्या अनेक नवीन चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र, त्याने केलेल्या एका विधानानंतर चाहत्यांचे लक्ष त्याने स्वत:कडे वेधले आहे.

बॉलिवूडचं फेमस कपल असलेल्या कतरिन कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाची जशी चर्चा रंगली. त्याचप्रमाणे त्यांच्या लग्नानंतरच्या सुखी संसाराचीही बॉलिवू़डसह माध्यमांत चर्चा असते. त्यामुळे, चाहत्यांनाही या दोघांच्या संसाराची राजी-खुशहाली समजून घ्यायला आवडते. विशेष म्हणजे विक्की कौशलही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी काही गोष्टी शेअर करताना दिसून येतो. त्याचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट लवकच प्रदर्शित होत आहे.

सध्या विक्की आपल्या अनेक नवीन चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र, त्याने केलेल्या एका विधानानंतर चाहत्यांचे लक्ष त्याने स्वत:कडे वेधले आहे. विशेष म्हणजे हे विधान त्याने कतरिताविषयी केली असून कतरिनाच्या हुश्शारीबद्दल त्याने चाहत्यांना माहिती दिली. माझी बायको चालती-फिरती डॉक्टर आहे, असे विक्कीने म्हटले होते. एका कार्यक्रमासाठी उपस्थित होता. त्यावेळी, विक्कीला आरोग्य आणि फिटनेसविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या फिटनेस आणि आरोग्यसंदर्भात भाष्य करताना विक्कीने कतरिनालाही याच क्षेत्राचं अधिक ज्ञान असल्याचं सांगितलं. माझं आरोग्य हे माझ्या मानसिक आरोग्यातून सुरू होते. माझ्यासाठी बाकी सर्व नंतर येतं. त्यासाठी, मी माझ्या कुटुंब आणि मित्रपरिवारावरच अवलंबून असतो. जर येथे सगळं चांगलं असेल तर पुढे सगळं उत्तम असतं, असे विक्कीने म्हटले. 

शारिरीक तंदुरुस्तीसाठी मी हेल्थी जेवण, पानी पीणे आणि गरजेनुसार झोप या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देतो, असे विक्कीने म्हटले. तसेच, आपल्या पत्नीचे कौतुक करत सांगितले की, तुम्ही माझ्या बायकोला तसं ओळखत नाहीत, पण ती चालती-फिरती डॉक्टर आहे. ती सायंटीस्टही आहे, तिला खूप ज्ञान आहे. ती माझे खाणे-पिणे आणि झोप याबद्दल अतिशय काळजीत असते. केवळ कामावरच ध्यान देत नाही ना, असाही विचार ती माझ्याबाबत करते, असे विक्कीने या कार्यक्रमात बोलताना सांगितले. दरम्यान, ९ डिसेंबर २०२१ रोजी विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्नगाठ बांधली आहे.  

 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूडडॉक्टर