Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये हा बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब, ९९% लोकांना माहित नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 12:28 IST

विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर रिलीज झालाय. या सिनेमात औरंगजेबाची भूमिका एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने साकारली आहे (vicky kaushal, chhaava)

विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाची खूप उत्सुकता होती. अखेर आज 'छावा'चा टीझर रिलीज झालाय. विकी कौशलचा जबरदस्त अंदाज टीझरमध्ये बघायला मिळतो. विकी या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. एका मिनिटांच्या या टीझरमध्ये सिनेमाचं भव्यदिव्य रुप बघायला मिळतंय. 'छावा'च्या टीझरमध्ये शेवटी औरंगजेबाची झलक पाहायला मिळते. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याने ही भूमिका साकारलीय. हा अभिनेता कोण आहे आम्ही तुम्हाला सांगतो.

या अभिनेत्याने साकारलाय 'छावा'मध्ये औरंगजेब 

'छावा'च्या एक मिनिटांच्या टीझरमध्ये शेवटी औरंगजेबाची भूमिका दिसते. 'सिवा चला गया लेकिन अपनी सोच जिंदा छोड गया', अशा डायलॉगमध्ये औरंगजेबाची झलक बघायला मिळते. अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारलीय. तुम्ही बरोबर वाचताय. जबरदस्त लूक केल्यामुळे अक्षय खन्नाला औरंगजेबाच्या भूमिकेत ओळखता येत नाहीय. त्यामुळे सिनेमात विकी कौशल-अक्षय खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार यात शंका नाही.

या तारखेला रिलीज होणार 'छावा'

नुकत्याच रिलीज झालेल्या 'छावा'च्या टीझरमध्ये विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. शंभूराजांच्या भूमिकेत विकीचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहणं ही एक पर्वणी असणार यात शंका नाही. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंची भूमिका साकारत आहे. ६ डिसेंबरला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे. 'स्त्री २' मॅडॉक फिल्मने या सिनेमाची निर्मिती केलीय. 

 

टॅग्स :विकी कौशलअक्षय खन्नाबॉलिवूड