Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुलींनी लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवले तर गैर काय? रेखा यांचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 16:00 IST

Rekha: काही वर्षांपूर्वी रेखा यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. या निमित्ताने त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं होतं.

आपल्या सदाबहार अभिनयासह सौंदर्यामुळे बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या रेखाचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं. त्याच्यापेक्षा कैकपटीने तिचं पर्सनल आयुष्य चर्चेत आलं. यामध्येच सध्या तिचं एक विधान चर्चेत आलं आहे. रेखा यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी मुलींच्या लग्नापूर्वीच्या शरीरसंबंधांविषयी भाष्य केलं आहे.

'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या आत्मचरित्रामध्ये रेखाच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. या पुस्तकात त्यांनी अशी काही वक्तव्य लिहिली आहेत जी थक्क करणारी आहेत. यामध्येच त्यांनी लग्नापूर्वीच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. याविषयी एका मुलाखतीत त्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं होतं.‘जर तुम्हाला पुरुषाच्या जवळ जायचं असेल तर तुम्ही ते फक्त शरीरसंबंधांच्या माध्यमातूनच करु शकता. जोपर्यंत तुमचे पुरुषासोबत शरीरसंबंध प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी जवळीक साधू शकणार नाही, असं रेखा यांनी म्हटलं होतं.

रेखा यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्यानंतर आणखी एक विधान केलं. यात लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणं गैर नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ‘जर लग्नाआधी कोणी शरीरसंबंध ठेवत असेल तर हे नैसर्गिक आहे. लोक म्हणत असतील की, मुलींनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवू नये तर ते लोक ढोंगी आहेत. लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणं यात काही गैर नाही.’ 

दरम्यान, रेखा यांचं फिल्मी  करिअर जितकं यशस्वी होतं. त्याच्यापेक्षा त्यांच्या पर्सनल आयुष्यात अनेक चढउतार आले. रेखा यांचं नाव अनेक दिग्गज कलाकारांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, आज त्या एकाकीच जीवन जगत आहेत. 

टॅग्स :रेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा