Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी कम्फर्टेबल नव्हते पण...'; पिरिअड्समध्ये रविनाने भरपावसात केला होता डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:00 IST

Raveena tandon: 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं इंडस्ट्रीत प्रचंड गाजलं. भरपावसात रविना आणि अक्षय कुमार यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री आयशा खान हिने अलिकडेच एका मुलाखतीमध्ये 'धुरंधर' या सिनेमाचा किस्सा सांगितला. या सिनेमातील शरारत  या गाण्याच्या चित्रीकरणावेळी तिला पिरिअड्स सुरु होत्या असं तिने सांगितलं. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. मात्र, कलाविश्वात घडलेला हा पहिला किस्सा नाही. कारण, यापूर्वी लोकप्रिय अभिनेत्री रविना टंडनला (raveena tandon) देखील अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूडमधील आयकॉनिक 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं तर सगळ्यांनाच ठावूक आहे. हे गाणं इंडस्ट्रीत प्रचंड गाजलं. भरपावसात रविना आणि अक्षय कुमार यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं होतं. या गाण्यातील रविनाच्या लूकची प्रचंड चर्चा झाली. मात्र, हे गाणं शूट करणं रविनासाठी प्रचंड त्रासदायक ठरलं होतं. त्यावेळी तिला पिरिअड्स सुरु होते आणि अशाच परिस्थितीमध्ये तिला गाण्याचं चित्रीकरण करावं लागलं होतं.

पिरिअड्समध्ये शूट झालं रविनाचं गाणं

रविनाने Asian Age ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. "Provocative गाण्यांवर डान्स करणं मला कधीच आवडलं नाही. मात्र, त्याकाळी मी स्वत:ची समजूत काढली आणि टिप टिप बरसा पानीचं शुटिंग करायला तयार झाले. हे गाणं खरंच चांगलं होतं. गाण्याची कोरिओग्राफी Erotic होती. मात्र, त्यात अश्लील डान्स स्टेप्स नव्हत्या. मी माझ्या करिअरमध्ये कधीच कोणतं चुकीचं काम करणार नाही हे नक्की", असं रविना म्हणाली.

पुढे रविना म्हणाली, "या गाण्याच्या शुटिंग वेळी मला मासिक पाळी आली होती. मात्र, गाण्याच्या सेटअपमध्ये पावसाचा सीन असल्यामुळे मला थंड पाण्यात उभं राहून चित्रीकरण पूर्ण करावं लागलं होतं."

दरम्यान,१९९४ साली रिलीज झालेल्या मोहरा या सिनेमातील टिप टिप बरसा पानी हे गाणं इंडस्ट्रीत तुफान गाजलं. इतकंच नाही तर या गाण्याला आयकॉनिक सॉग म्हणून आज ओळखलं जातं. या सिनेमात रविना आणि अक्षय व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह, सुनील शेट्टी, रजा मुराद, परेश रावल, गुलशन ग्रोवर आणि सदाशिव यांसारखी कलाकार मंडळी झळकली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Raveena Tandon's 'Tip Tip Barsa Pani' shoot during her period.

Web Summary : Raveena Tandon faced discomfort shooting 'Tip Tip Barsa Pani' during her period. Despite initial reservations about provocative songs, she agreed, finding the song tasteful. The shoot involved standing in cold water, adding to the challenge.
टॅग्स :रवीना टंडनसिनेमासेलिब्रिटीअक्षय कुमारबॉलिवूड