Join us

Sunjay Kapur: संजय कपूर यांची शेवटची इच्छा काय होती? वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:44 IST

Sunjay Kapur : संजय कपूर यांची शेवटची इच्छा काय होती, याचा खुलासा त्यांच्या एका मैत्रिणीने केला आहे. अनेकांना ही इच्छा वाचून दुःख होतंय

करिश्मा कपूरचे Ex पती संजय कपूर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. इंग्लंडच्या गार्ड्स क्लबमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने संजय कपूर यांचं निधन झालं. संजय कपूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आयुष्य समरसून जगणाऱ्या संजय कपूर यांची शेवटची इच्छा काय होती, याविषयी त्यांच्या खास मैत्रिणीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून खुलासा केला आहे. संजय कपूर यांची शेवटची इच्छा वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

काय होती संजय कपूर यांची शेवटची इच्छा?

'फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलीवुड वाइव्स’ या सीरिजमधील अभिनेत्री कल्याणी साहा आणि संजय यांची चांगली मैत्री होती. कल्याणीने संजय कपूर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयी भावुक खुलासा केला आहे. ती लिहिते, "संजयला कोणत्याही गोष्टीचा दिखावा करणं आवडायचं नाही. तो जे काही करायचा त्यात सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करायचा. संजयची इच्छा होती की, अजारियससाठी तो चांगला बाबा बनू शकेल. याशिवाय कमीतकमी १०० वर्ष जगायची त्याची इच्छा होती." असा खुलासा तिने केलाय. संजय यांची ही इच्छा वाचून सर्वजण भावुक झाले आहेत.

संजय यांच्यावर आज अंत्यसंस्कार

संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी त्यांच्यावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजय यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व होतं. त्यामुळे त्यांचं पार्थिव भारतात आणण्यास काही अडचणी येत होत्या. अखेर, त्यांचं पार्थिव आज दिल्लीत आणण्यात येणार असून मृत्यूनंतर ७ दिवसांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजय यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांची पूर्व पत्नी करिश्मा कपूर उपस्थित राहणार आहे. 

आज दिल्लीतील लोधी रोड येथे संध्याकाळी ५ वाजता संजय यांच्यावव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रविवार, २२ जून २०२५ रोजी संजय कपूर यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये ४-५ वाजता ही शोकसभा होणार आहे. 

टॅग्स :संजय कपूरकरिश्मा कपूरमृत्यूबॉलिवूडइंग्लंड