मुंबई : बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या विवाहाच्या चर्चा रंगल्या असतानाच कतरिना हिने आता या विषयावर आपले मौन सोडले आहे. विवाहाच्या चर्चांवर कतरिना म्हणाली, “या सगळ्या अफवा आहेत. यात काही तथ्य नाही.” त्यामुळे आता दोघांच्या विवाहाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे विवाह करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघे विवाहाच्या तयारीस लागले आहेत, असे वृत्तदेखील बुधवारी आले होते. आणि त्यांची वस्त्रे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी हे डिझाईन करीत आहेत, अशी चर्चा होती. वांद्रे स्थित सेलिब्रिटी मॅनेजर रश्मा शेट्टी यांच्या कार्यालयात विकी आणि कतरिना एकत्र आले होते. तेव्हापासून या दोघांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले आहे.
विकी कौशलसोबत विवाहाची अफवा - कतरिना कैफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 07:49 IST