ऐश्वर्या रॉयने २०१० मध्ये आलेल्या अॅक्शन रिप्ले चित्रपटामध्ये सुमारे १३० ड्रेस घातले होते. तर २०१२ मध्ये आलेल्या हिरोईन चित्रपटामध्ये करिना कपूरने सुमारे १२५ ड्रेस घातले होते. काही चित्रपटांमध्ये अभिनेत्री १० पेक्षा अधिक गाऊन वापरतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या मुख्य अभिनेत्रींच्या काही ड्रेसची किंमत ही लाखोंच्या घरात असते. मात्र या कपड्यांचं नंतर काय करतात, हा प्रश्न इतरांप्रमाणे तुम्हालाही पडला असेल. तर त्याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या कपड्यांच्या माध्यमातून कधी कधी निर्मात्यांना चांगल्या बक्कळ कमाईचं साधन मिळू शकतं. अनेकदा कलाकारांनी वापरलेलं एकादं टॉवेलसुद्धा लाखो रुपये मिळवून देतं. सलमान खानने ज्या टॉवेलसह डान्स स्टेप केले होते, त्याचं लिलाव झालं आहे. बँड बाजा बारात आणि रिकी बहर सारख्या चित्रपटांमध्ये ड्रेस डिझाइव करणाऱ्या डिझायनर आएशा खन्ना यांनी मिड डे ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, यशराज प्रॉडक्शनमध्ये सर्व कपडे लेबल लावून स्टोअर केले जातात. या कपड्यांसोबत चित्रपटांचं नाव आणि पात्राची सविस्तर माहिती ठेवली जाते. त्यानंतर पुढच्या चित्रपटांमध्ये हे कपडे गरजेनुसार मिक्स केले जातात.
कधी कधी चित्रपटामधील कलाकार आपल्या पात्राची आठवण म्हणून चित्रपटातील काही सामान आपल्या घरीसुद्धा घेऊन जातात. रणबीर कपूरने ये जवानी है दिवानीमधील सर्व स्वेटर आपल्याकडे ठेवले होते. दीपिका पादुकोणसुद्धा तिच्या आवडत्या पात्रांच्या काही वस्तू आपल्याकडे ठेवते. असंच काही सामान जे कलाकारांच्या आवडीचं आहे, ते कलाकार घेऊन जातात.
मात्र काही सुपरहिट चित्रपटांमध्ये कलाकारांनी घातलेल्या कपड्यांचा लिलाव चित्रपटांच्या निर्मात्यांना कमाईचा जबरदस्त मार्ग उपलब्ध करून देतो. मात्र हे प्रत्येक चित्रपटाच्याबाबतीत घडतंच असं नाही. अनेकदा चित्रपटातील पात्र किंवा काही सिन्स ज्या कपड्यांमध्ये प्रसिद्ध होतात. त्यांचं लिलावसुद्धा केलं जातं. सन २००४ मध्ये डेव्हिड धवन यांच्या मुझसे शादी करोगी मधील जिने के है चार दिन गाणं खूप हिट झालं होतं. त्यात सलमान खानने टॉवेल सोबत काही जबरदस्त डान्स स्टेप्स दाखवले होते. त्या टॉवेलचा लिलाव करण्यात आला होता. ते टॉवेल १ लाख ४२ हजार रुपयांना विकले गेले होते.