Join us  

"आमची चूक झाली...", रोहित शेट्टीने 'सर्कस' फ्लॉप होण्यामागचं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:06 AM

Circus Movie : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अनेक कलाकार दिसले होते.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करण ८ (Koffee With Karan 8) सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये नुकतेच रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये तो अनेक गोष्टींबद्दल बोलला. यासोबतच रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' (Circus Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप झाला? याचे कारणही सांगितले. सर्कस चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. प्रेक्षकांनीही या चित्रपटावर बरीच टीका केली होती. आता रोहित शेट्टीने चित्रपटाच्या अपयशावर मौन सोडले आहे.

अलीकडेच अजय देवगण आणि रोहित शेट्टी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दिसले होते. शोमध्ये करण जोहरने जेव्हा रोहित शेट्टीला सर्कस चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी का करु शकला नाही, याबद्दल विचारले. त्यावर रोहित शेट्टीने  सांगितले की तो दिग्दर्शक म्हणून अपयशी ठरला.

'सर्कस'च्या अपयशावर रोहित शेट्टी म्हणाला...रोहित शेट्टी म्हणाला, 'होय, आमची चूक झाली आणि हा महामारीच्या काळात बनलेला चित्रपट होता. सूर्यवंशीच्या रिलीजपूर्वी करण्यात आला होता. त्या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून कुठेतरी माझी चूक झाली. हा एक छोटा चित्रपट होता ज्यात माझ्याकडून चूक झाली, मोठा चित्रपट नाही. तीन दिवसांनी मी माझ्या वेब सीरिजचे शूटिंग करत होतो.

'सर्कस'बद्दल'सर्कस'मध्ये रणवीर सिंग आणि वरुण शर्मा यांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा आणि मुकेश तिवारी देखील या चित्रपटात होते. त्यात दीपिका पदुकोणनेही स्पेशल डान्स केला होता.

लवकरच येणार 'सिंघम अगेन'सध्या रोहित शेट्टी सिंघम अगेन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण असे अनेक स्टार्स दिसणार आहेत. यासोबतच रोहित शेट्टीही 'भारतीय पोलीस दल' या मालिकेसह ओटीटीमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीअजय देवगणकरण जोहरकॉफी विथ करण 6