Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' चित्रपटासाठी किंग खानने घेतला नव्हता एकही रुपया; विवेक वासवानी यांनी सांगितला दिलदार शाहरुखचा खास किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:23 IST

अभिनेता शाहरुख खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार मानला जातो. यामागे फक्त त्याचा अभिनयच नसून अनेक कारणं आहेत

एकदा स्टार झाल्यानंतर अभिनेते छोटी भुमिका जरी असली तरी कोट्यवधी रुपयांंचं मानधन घेतात. नुसते आकडे पाहून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ येते.  पण, बॉलिवूडमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेलं असलं तरी अभिनेता शाहरुख खानने विवेक वासवानी यांच्या एका चित्रपटांमध्ये मानधन न घेता काम केलं होतं. याचा खुलासा खुद्द विवेक वासवानी यांनी केला आहे. 

नुकतेच विवेक वासवानी यांनी सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खुलासा केला की शाहरुखने दुल्हा मिल गया सिनेमा फुकटात केला होता. या सिनेमासाठी त्यानं एकही रुपया घेतला नव्हता. विवेक वासवानी म्हणाले, ' मी चित्रपट घेऊन त्याच्याकडे गेलो. तेव्हा तो म्हणाला विवेक पहिल्यांदाच चित्रपट घेऊन आले आहेत. मी तो करेन. शाहरुखने चित्रपटाची स्क्रिप्टही ऐकली नाही आणि चित्रपट केला. चित्रपटात शाहरुखचा एक कॅमिओ होता, जो केवळ 42 मिनिटांचा होता. त्यानं आम्हाला पाच दिवसांचा वेळ दिला आणि आम्ही शुटिंग पाच दिवसांत पूर्ण केलं. शाहरुखने आम्हाला जे हवं होतं तेच केलं. त्यानं हस्तक्षेप केला नाही'.

 किंग खान शाहरुख याने आतापर्यंत अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख खान याने अनेक सिनेमे आजही चाहते तितक्याच आनंदाने पाहातात.  कोणत्याही गॉडफादरशिवाय त्यांनी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली. पण, किंग खानच्या कारकिर्दीत विवेक वासवानी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. विवेक वासवानी आणि शाहरुख खान खूप जुने मित्र आहेत आणि संघर्षाच्या काळात ते एकत्र होते. विवेक वासवानी यांनीच शाहरुखला 'राजू बन गया जेंटलमन' मध्ये ब्रेक दिला होता. विवेक वासवानी आणि शाहरुख हे सध्या एकमेंकापासून दूर असले तरी त्यांच्यात तेवढचं प्रेम आणि एकमेंकाबद्दल काळजी आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासुश्मिता सेन