Join us

'निदान आता तरी आम्ही न घाबरता...', एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच विवेक अग्निहोत्रींचं ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 13:24 IST

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर 'द कश्मीर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व खात्यांच्या रितसर बैठका शिंदे आणि फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत.  एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  'द कश्मीर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपली यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आणि शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. एकनाथ शिंदे तुमचं अभिनंदन आणि एका डानयनामिक लीडरशिपसाठी देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा. निदान आता तरी आम्ही न घाबरता जगू शकतो. #जयमहाराष्ट्र

विवेक अग्निहोत्री यांचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होतेय. विवेक अग्निहोत्री यांच्या आधी कंगना राणौतनेही इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. 'यशाची किती प्रेरणादायी गोष्ट आहे... ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत... अभिनंदन सर.' कंगना ही केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची समर्थक आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेबॉलिवूड