Join us

अनुष्का-अकायला सोडून विराटने वामिकासोबत घालवला वेळ, बापलेकीचा क्युट Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:29 IST

अनुष्का-विराटची लेक वामिका ३ वर्षांची आहे. विराट-वामिकाचा हा क्युट फोटो चाहत्यांना भलताच आवडलाय.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच पुन्हा आईबाबा झाले आहेत. अनुष्काने १५ फेब्रुवारीला लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. दोघांनी लेकाचं नाव 'अकाय' असं ठेवलं आहे. सध्या विराट आणि अनुष्का दोघंही आपल्या मुलांसोबत लंडनमध्येच आहेत. दुसऱ्या बाळाचा जन्म होणार म्हणून विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसंघातून माघार घेतली होती. तो सध्या कुटुंबाला वेळ देत आहे. विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये तो वामिकासोबत (Vamika) एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.

अनुष्काने २०२१ साली वामिकाला जन्म दिला होता.  वामिका आता ३ वर्षांची असून तिचा आता लहान भाऊही आला आहे. अनुष्का-विराटने नो फोटो पॉलिसीमुळे अद्याप वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. मात्र तरी वामिकाचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर याआधी व्हायरल झाले होते. आता विराट आणि वामिकाचा लंडनच्या रेस्टॉरंटमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये छोटी वामिका खुर्चीवर बसली असून खाण्यात मग्न दिसत आहे. तर विराटही टेबलवर तिच्या बाजूला बसलेला आहे. वामिकाला छानशी वेणी घातलेली दिसत आहे तसंच तिने ब्लॅक अँड व्हाईट शर्ट घातला आहे. तर विराटही त्याच्या कूल लूकमध्ये दिसतोय. अनुष्का अकायसोबत वेळ घालवत असतानाच विराट लेकीसोबत लंचवर आल्याचं पाहायला मिळत आहे. विराट आणि वामिकाचा हा फोटो सोशल मीडियावर काही क्षणात वेगाने व्हायरल झाला. विराटच्या चाहत्यांना हा क्युट फादर-डॉटरचा फोटो भलताच पसंतीस पडला आहे.

नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट करत 'वामिका किती मोठी झालीये' अशी कमेंट केली आहे. विराट खरोखरंच किती डेडिकेटड नवरा आणि वडील आहे असंही म्हणत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. आात दोघंही कधी परत भारतात येतात याचीच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीलंडनपरिवारव्हायरल फोटोज्सोशल मीडिया