Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीने साजरा केला पत्नी अनुष्काचा वाढदिवस, क्युट कपलचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:35 IST

विराट-अनुष्का डिनर डेटवर

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) 1 मे रोजी 36वा वाढदिवस साजरा केला. काही दिवसांपूर्वीच अनुष्का दोन्ही मुलांसह भारतात परत आली आहे. मात्र भारतात आल्यापासून तिने कॅमेऱ्यासमोर येणं टाळलं होतं. आता तिचा पहिला फोटो समोर आला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli)बायकोसाठी वाढदिवसाला डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत फाफ ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल पत्नींसोबत दिसत आहेत.

विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कार्डचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'शेफ, अतिशय चविष्ट जेवणासाठी धन्यवाद.' या फोटोतून स्पष्ट होतं की विराट कोहलीने अनुष्काचा वाढदिवस बंगळुरुमधील एका हाय स्केल रेस्टॉरंटमध्ये साजरा केला. या कार्डवर सेलिब्रेटिंग अनुष्का असे लिहिण्यात आले होते. 

तर फाफ ड्युप्लेसिसने डिनर टेबलवरील सर्वांचा एकत्र फोटो शेअर केला. यामध्ये विराट अनुष्काच्या खांद्यावर हात ठेवून बसला आहे. दोघंही खूप आनंदी दिसत आहेत. सध्या 'विरुष्का'चा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

विराटने अनुष्काच्या वाढदिवसासाठी खास पोस्टही केली होती. यात त्याने अनुष्काचे सुंदर फोटो शेअर केले. सोबतचे लिहिले, "आयुष्यात जर मी तुला शोधलं नसतं तर मी हरवून गेलो असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. आपल्या एकत्रित आयुष्यातला तू प्रकाश आहेस. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे."

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीबॉलिवूडसोशल मीडिया