Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरुष्काने गुडन्यूज देताच सोशल मीडियावर धुमाकूळ, 'अकाय'च्या नावाने उघडले ढीगभर फॅन पेजेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 09:32 IST

विरुष्काच्या लेकाची आतापासून सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे.

Virat Anushka Baby Boy: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरी १५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा पाळणा हलला. अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर पाच दिवसांनी विराट-अनुष्काने सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर केली. तसंच मुलाचं नावही जाहीर केलं. 'अकाय' (Akaay Kohli)असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. दरम्यान या खुशखबरीनंतर लगेचच 'अकाय'च्या नावाने सोशल मीडियावर ढीगभर पेज उघडण्यात आले आहेत. विरुष्काच्या लेकाची आतापासून सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्काच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. ती लवकरच लंडनमध्ये बाळाला जन्म देणार या चर्चांना उधाण आले होते. अखेर विराट-अनुष्काने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. 2021 मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव 'वामिका'. वामिकाच्या जन्मानंतर सोशल मीडियावर कोहली कुटुंबाचे अनेक फोटो व्हायरल झाले. आता ३ वर्षातच अनुष्का पुन्हा आई झाली आहे. विराट अनुष्काचे जगभरात अगणित चाहते आहेत. त्यानंतर वामिकालाही चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. आता 'अकाय'चीही सोशल मीडियावर आतापासूनच क्रेझ पाहायला मिळत आहे. विराट-अनुष्काने गुडन्यूज देताच काही क्षणात 'अकाय कोहली' अशा नावांनी इन्स्टाग्रामवर ढिगभर फॅन पेजेस उघडण्यात आले आहेत. अद्याप चाहत्यांकडे वामिकाचेही फोटो नाहीत तर आता अकायच्या फोटोंसाठीही चाहत्यांना वाट बघावी लागणार आहे. मुलांचे फोटो कुठेही दाखवायचे नाहीत अशी ताकीद आधीच अनुष्का-विराटने फोटोग्राफर्सना दिली आहे. तरी या फॅन पेज अकाऊंटवर कुठे विराटच्या बालपणीचा तर कुठे विरुष्काचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच 'अकाय' चा नेमका अर्थ काय यावरुनही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विराट-अनुष्काने काल सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर करत लिहिले, "आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा याचे स्वागत केले. वामिकाच्या धाकट्या भावाचे नाव या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद," 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसोशल मीडियाइन्स्टाग्राम