Join us

अंबानींच्या लग्नसोहळ्याला न जाता 'या' ठिकाणी व्यस्त आहेत 'विरुष्का', अनुष्काने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 10:23 IST

सध्या विराट आणि अनुष्का लंडनमध्ये असून तिथे नक्की काय करत आहेत याची झलक अनुष्काने सोशल मीडियावर दाखवली.

एकीकडे भारतात अंबानींच्या लग्नसोहळ्याची चर्चा आहे. उद्योग, मनोरंजन, खेळ, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. रजनीकांत, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंह ते एम एस धोनी, हार्दिक पांड्या, गौतम गंभीर या क्रिकेट खेळाडूंनीही सोहळ्याची शोभा वाढवली. या लग्नाला सर्वांनीच विराट-अनुष्का या पॉवरफुल कपलची आठवण काढली. सध्या विराट (Virat Kohli) आणि अनुष्का (Anushka Sharma) लंडनमध्ये असून तिथे नक्की काय करत आहेत याची झलक अनुष्काने सोशल मीडियावर दाखवली.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने टीम सोबत मुंबईत येऊन विजय साजरा केला. यानंतर त्याच रात्री विराट अनुष्का आणि दोन्ही मुलांकडे लंडनला रवाना झाला. सध्या कोहली कुटुंब लंडनमध्येच असून ते तिथेट शिफ्ट झाल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काचा लंडनमध्ये एका कीर्तनात दंग झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता स्वत: अनुष्कानेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत.कृष्ण दास यांचा तो फोटो आहे. त्यांचं कीर्तन ऐकण्यात ती दंग आहे. 

अनुष्का आणि विराट नीम करोली बाबा यांचे भक्त आहेत. कृष्ण दास हे मूळ अमेरिकी गायक आहेत जे नीम करोली बाबा यांचे शिष्यही आहेत. आपल्या भारत भेटीदरम्यान ते नीम करोली बाबा यांच्या आश्रमात गेले होते. तेव्हापासून त्यांनी स्वत:ला कीर्तनात वाहून घेतलं. अंबानी लग्नसोहळ्याला हजेरी न लावता विराट आणि अनुष्का सध्या इथेच वेळ घालवत आहेत. दोघंही भारतात कधी परतणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माबॉलिवूडलंडनसोशल मीडिया