Join us

'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:17 IST

Mannara chopra: मुंबईत पहिला पाऊस पडला याच्या आनंदात तिने हे रील केलं होतं. मात्र, तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले.

 बिग बॉसमुळे (bigg boss) सध्या चर्चेत येत असलेली अभिनेत्री म्हणजे मन्नारा चोप्रा. अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण असलेल्या मन्नाराला बिग बॉसमुळे खरी ओळख मिळाली. त्यामुळे सध्या ती सातत्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असते. यात सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

सध्या सोशल मीडियावर मन्नाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये तिने 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमातील अखियाँ गुलाब या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. मुंबईत पहिला पाऊस पडला याच्या आनंदात तिने हे रील केलं होतं. मात्र, तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले.

नुकताच मुंबईमध्ये वादळी पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं. तर काहींना त्यांचे प्राणही गमवावे लागले. मात्र, अशा परिस्थितीमध्ये मन्नाराने डान्स व्हिडीओ शूट केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिली ट्रोल केलं आहे. लोकां

काय म्हणाले नेटकरी?

'इथे लोकांचे जीव जातायेत आणि तुला डान्स करायचं सुचतंय?', ' सगळे लोक काळजीत आहेत आणि ही नाचत सुटलीये',' अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि या ब्रेनलेस श्रीमंत लोकांना रील करायचं सुचतंय,' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबिग बॉसपाऊसमुंबई